श्रीगोंदा तालुक्यातील संतोष शिंदे टोळीतील सहा जणांना मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 10:20 AM2021-10-19T10:20:23+5:302021-10-19T10:20:51+5:30
श्रीगोंदा : संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील राजापुर येथील संतोष राघु शिंदे याचे टोळीतील सहा गुन्हेगारांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिली.
श्रीगोंदा : संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील राजापुर येथील संतोष राघु शिंदे याचे टोळीतील सहा गुन्हेगारांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिली.
संतोष राघु शिंदे, चंदु भाऊसाहेब घावटे, राजेंद्र बबन ढवळे ( राजापुर ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), चेतन काळुराम कदम, सागर विनोद ससाणे( रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा), राजु ऊर्फ राजेंद्र मधुकर उबाळे (रा. कुरुद ता. पारनेर), शफिक शब्बीर शेख ( रा. नारायणगव्हाण ता. पारनेर) याच्या विरोधात मोक्का लावला आहे.
या टोळ्यांविरुद्ध मोक्का कायद्याअन्वये कारवाई करणे करीता तत्कालीन प्रभारी अधिकारी बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी २६ जुन २०२१ रोजी प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांचेकडे पाठवला होता. त्या प्रस्तावास. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांची महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील कलमाप्रमाणे वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळाली.
या टोळ्यांविरुद्ध दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रासह जबरी चोरी करणे, दरोडयाची तयारी करणे, गंभीर दुखापत करणे अशा स्वरुपाचे गुन्हे, कट करुन व संगनमताने स्वतःचे व टोळीचे आर्थिक फायद्याकरीता दशहत निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर टोळीप्रमुख व साथीदार यांचे वर वेळोवेळी प्रतिबंध कारवाई करून ही टोळीची गुन्हेगारी वाढत होत असल्याने या टोळीविरुध्द प्रचलित कायद्यानुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (i), ३(२) व ३(४) (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या आरोपींच्या विरोधातील गुन्ह्यांचा तपास कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव हे करणार आहेत.