मॉकड्रील : नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसवर अतिरेकी हल्ला होतो तेव्हा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 06:31 PM2019-05-26T18:31:25+5:302019-05-26T18:33:03+5:30

अतिरेक्यांना ब्लॅक कॅट कमांडो आधुनिक शस्त्रांद्वारे चोख प्रत्युत्तर देत हल्ला परतवून लावतात. सुरक्षाव्यवस्था तपासण्यासाठी सुमारे चार तास रंगीत तालीमचा (मॉकड्रिल) हा भाग असल्याचे जाहीर केले जाते आणि प्रत्येकाचाच जीव भांड्यात पडतो.

Mockredial: When terrorists attack Nashik's India Security Press .... | मॉकड्रील : नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसवर अतिरेकी हल्ला होतो तेव्हा....

मॉकड्रील : नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसवर अतिरेकी हल्ला होतो तेव्हा....

Next
ठळक मुद्देलढाऊ हेलिकॉप्टरद्वारे शंभर कमांडोंची तुकडी मुद्रणालयाच्या आवारात जवान आणि अतिरेक्यांमध्ये जोरदार चकमक

नाशिक : भारत प्रतिभूती मुद्रणालयावर काही समजण्याअगोदरच अतिरेक्यांकडून बॉम्बस्फोट व बेछूट गोळीबार सुरू झाल्याने सुरक्षेविषयी अ‍ॅलर्ट देणारा सायरन वाजतो अन् सीआयएसएफचे जवान तत्काळ प्रत्युत्तर देण्यास सज्ज होतात; मात्र अतिरेक्यांकडून जोरदार आधुनिक सामुग्रीद्वारे हल्ला केला जात असल्याने मोठे नुकसान होऊ नये, म्हणून तत्काळ केंद्र सरकारशी संपर्क साधून एनएसजी ब्लॅक कॅट कमांडोची (राष्ट्रीय सुरक्षा रक्षक) मदत मागितली जाते. अवघ्या अर्ध्या तासात लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे शंभर कमांडोंची तुकडी मुद्रणालयाच्या आवारात दाखल होते आणि अतिरेक्यांना ब्लॅक कॅट कमांडो आधुनिक शस्त्रांद्वारे चोख प्रत्युत्तर देत हल्ला परतवून लावतात. सुरक्षाव्यवस्था तपासण्यासाठी सुमारे चार तास रंगीत तालीमचा (मॉकड्रिल) हा भाग असल्याचे जाहीर केले जाते आणि प्रत्येकाचाच जीव भांड्यात पडतो.
सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या सरकारी दस्तऐवज मुद्रीत करण्याचे ठिकाण असलेले भारत सरकारचे भारत प्रतिभूती मुद्रणालयावर अतिरेक्यांनी रविवारी (दि.२६) हल्ला चढविला. हा हल्ला इतका भीषण होता की अतिरेक्यांनी थेट ग्रेनेडचा स्फोट घडवून आणाला. यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले. अतिरेक्यांकडे आधुनिक शस्त्रे असल्यामुळे त्यांनी बेछूट गोळीबार करण्यास सुरूवात केली. मुद्रणालयाच्या सुरक्षेसाठी असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी त्यांचा हल्ला थोपवून धरत प्रतिकार करण्यास सुरूवात केली; मात्र हल्ला भीषण स्वरूपाचा असल्याचे लक्षात येताच मुद्रणालय प्रशासनाने राज्य शासनाकडे एनएसजी कमांडोची मदत मागितली. राज्य सरकारकडून तातडीने केंद्राकडे याबाबत मागणी करण्यात येते आणि अवघ्या काही वेळेत १०० ब्लॅक कॅट कमांडो मुद्रणालयात हवाई मार्गे दाखल होतात आणि अतिरेक्यांवर हल्ला चढवितात. अत्याधुनिक शस्त्रास्त्राने सज्ज असलेल्या या जवान आणि अतिरेक्यांमध्ये जोरदार चकमक चालते. अखेर कमांडो अतिरेक्यांना यमसदनी धाडण्यास यशस्वी होतात व ओलीस ठेवलेल्या कामगारांची सुरक्षितरित्या सुटका करतात.यावेळी एनएसजीचे कर्नल नितेश कुमार, सीआयएसफचे कमांडट के. के.भारव्दाज,राघवेंद्र सिंह, प्रेसचे महाव्यवस्थापक प्रसन्नकुमार साहू यांसह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Mockredial: When terrorists attack Nashik's India Security Press ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.