बाप्पाच्या प्रसादात मोदकांवर जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:40 AM2017-08-27T00:40:09+5:302017-08-27T00:40:13+5:30
गणेशोत्सव म्हटल्यावर मोदक, लाडू, बर्फीसह गोडधोड प्रसादांची रेलचेल डोळ्यासमोर येते. मात्र नोकरी व्यवसायामुळे नोकरदार महिलांना हे पदार्थ घरी बनवण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे भाविकांची प्रसादाची गरज लक्षात घेऊन सध्या बचतगटांसह केटरिंगचा व्यवसाय सांभाळणाºया महिलांकडून प्रसादाचे पदार्थ तयार करून घेण्यावर भर दिला जात आहे. आॅर्डर मिळत असल्याने या गृहउद्योगी महिलांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
नाशिक : गणेशोत्सव म्हटल्यावर मोदक, लाडू, बर्फीसह गोडधोड प्रसादांची रेलचेल डोळ्यासमोर येते. मात्र नोकरी व्यवसायामुळे नोकरदार महिलांना हे पदार्थ घरी बनवण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे भाविकांची प्रसादाची गरज लक्षात घेऊन सध्या बचतगटांसह केटरिंगचा व्यवसाय सांभाळणाºया महिलांकडून प्रसादाचे पदार्थ तयार करून घेण्यावर भर दिला जात आहे. आॅर्डर मिळत असल्याने या गृहउद्योगी महिलांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर्षी गणपती व महालक्ष्मींच्या नैवेद्य आणि प्रसादात उकडीचे ११, २१ पासून ते १०००च्या संख्येत मोदक बनवून घेतले जात आहेत. याशिवाय कणिक, मैदा यांपासून तयार केलेले खोबरे, पिठीसाखरेचे तळणीचे, खव्याचे मोदक २०० किलो ते ५०० किलो या प्रमाणात बनवून घेतले जात आहे. घरगुती गणपती, मंडळ, कंपन्या यांनुसार आॅर्डरचे प्रमाण ठरत आहे. घरगुती पद्धतीने, सात्विकतेसह स्वच्छता सांभाळत बनविल्या जाणाºया या स्वादिष्ट, कुरकुरीत मोदकांना भाविकांकडून पसंतीही मिळत आहे. मोदकांच्या माध्यमातून महिलांचा चांगला आर्थिक फायदा होत आहे.