स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रभाग रचनेपासूनच आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 02:53 PM2018-08-03T14:53:37+5:302018-08-03T14:55:44+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा होण्यापुर्वीच निवडणूक यंत्रणेकडून प्रभाग रचना, मतदार याद्यांच्या अद्यावतीकरण, प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम केले जाते. अशा वेळी राजकारण्यांकडून वा संबंधितांकडून याकामात हस्तक्षेप होण्याच्या

Model Code of Conduct from Local Body | स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रभाग रचनेपासूनच आचारसंहिता

स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रभाग रचनेपासूनच आचारसंहिता

Next
ठळक मुद्देआयोगाचा निर्णय : प्रतिबंधात्मक कारवाई, मालमत्तेची चौकशीसमाजकंटकांची धरपकड, पैसे व मद्य वाटपावर लक्ष

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभाग रचना जाहीर करण्यापासूनच राजकारण्यांचा निवडणूक प्रक्रियेत होत असलेल्या हस्तक्षेपाबाबत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रारी गेल्याने यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रत्येक निवडणूका निष्पक्ष व पारदर्शीपणे पार पडाव्यात यासाठी ज्या संस्थांच्या निवडणूका होणार आहेत, त्यांच्या कार्यक्षेत्रात निवडणूक पुर्व आदर्श आचारसंहिता लागू केली जाणार असून, प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होताच, समाजकंटकांची धरपकड, पैसे व मद्य वाटपावर लक्ष ठेवण्याच्या सुचना आयोगाने दिल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने अलिकडेच या संदर्भातील आपली भूमिका जाहीर केली असून, त्यात प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा होण्यापुर्वीच निवडणूक यंत्रणेकडून प्रभाग रचना, मतदार याद्यांच्या अद्यावतीकरण, प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम केले जाते. अशा वेळी राजकारण्यांकडून वा संबंधितांकडून याकामात हस्तक्षेप होण्याच्या व त्यात प्रामुख्याने निवडणूक विषयक कामे करणाऱ्या शासकीय कर्मचाºयांचा सहभाग असण्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. मतदार यादी वा प्रभाग रचना तयार करतांनाच पक्षपात केला जात असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. त्यामुळेच की काय प्रभाग रचनेपासूनच निवडणूकेच्छूकांकडून निवडणूक जिंकण्याच्या इर्षेने निवडणूक आचारसंहितेचे पावलोपावली उल्लंंघन केले जाते किंबहुना तेव्हापासूनच निवडणूक तयारीला सुरूवात केली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रारंभी मतदार यादीचे काम हाती घेतले जाते त्यानंतर लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभाग रचना जाहीर केले जाते, प्रभाग रचनेनुसार मतदार यादीचे विभाजन केल्यानंतर प्रत्यक्ष मतदान घेतले जाते या तीन्ही टप्प्यावर निवडणुकीचे काम पारदर्शी व निष्पक्षपणे व्हावे यासाठी आयोगाने यापुढे मतदार यादीचे काम कर्तव्यदक्ष, निष्पक्ष व सचोटीच्या अधिकाºयांकरवी केले जावे अशी सुचना केली असून, या कामावर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांच्या नेमणूका करण्यात याव्यात तसेच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपण्याच्या दिनांकास ज्या अधिकाºयांना सध्याच्या पदावर ३ वर्षे पुर्ण होत असतील त्यांना निवडणुकीचे काम दिले जावू नये असेही सुचविण्यात आले आहे.

Web Title: Model Code of Conduct from Local Body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.