अभियंता दिनानिमित्त मॉडेल मेकिंग, पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:05 AM2017-09-16T00:05:59+5:302017-09-16T00:06:11+5:30

श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘सिव्हिल वॉर -२०१७’ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष हरीश संघवी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यात ब्रिज, टॉव्हर मेकिंग आणि मॉडेल मेकिंग या टेक्निकल (तांत्रिक)स्पर्धांसह पोस्टर मेकिंग आणि रांगोळी यांसारख्या नॉनटेक्निकल (बिगरतांत्रिकी) स्पर्धा घेण्यात आल्या.

 Model Making, Paper Presentation Competition on Engineer Day | अभियंता दिनानिमित्त मॉडेल मेकिंग, पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा

अभियंता दिनानिमित्त मॉडेल मेकिंग, पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा

Next

नाशिक : श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘सिव्हिल वॉर -२०१७’ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष हरीश संघवी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यात ब्रिज, टॉव्हर मेकिंग आणि मॉडेल मेकिंग या टेक्निकल (तांत्रिक)स्पर्धांसह पोस्टर मेकिंग आणि रांगोळी यांसारख्या नॉनटेक्निकल (बिगरतांत्रिकी) स्पर्धा घेण्यात आल्या.  अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवल्याने स्पर्धांमध्ये चुरस दिसून आली. ब्रिज मेकिंग स्पर्धेत शीतल सोनवणे आणि ग्रुपने प्रथम क्र मांक पटकावला, तर टॉव्हर आणि मॉडेल मेकिंग स्पर्धेत कल्पेश गायकवाड आणि ग्रुप व योगेश ढगे आणि ग्रुपने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. त्यांना पारितोषिक विभागून देण्यात आले. गौरव माथेरे आणि ग्रुपला व्दितीय पारितोषिक देण्यात आले. पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत कुणाल पवार याला प्रथम, तर शोएब अत्तर आणि ग्रुपला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. पोस्टर मेकिंग स्पर्धेत पूजा कुमावतला प्रथम पारितोषिक देण्यात आले. रांगोळी स्पर्धेत मुकेश बेलदार याला प्रथम, तर सोनाली कोठुळे आणि ग्रुपला व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरीश संघवी, प्राचार्य मनोज बुरड आणि सतीश कदम यांच्या हस्ते पोरितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title:  Model Making, Paper Presentation Competition on Engineer Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.