वडांगळी जिल्हा परिषद शाळेला मॉडेल स्कूलचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:15 AM2021-02-24T04:15:42+5:302021-02-24T04:15:42+5:30
विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या भौतिक सुविधा मिळण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षणही मिळावे यासाठी सर्व सुविधांयुक्त अशी जिल्हा परिषद शाळा वडांगळीत निर्माण व्हावी, ...
विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या भौतिक सुविधा मिळण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षणही मिळावे यासाठी सर्व सुविधांयुक्त अशी जिल्हा परिषद शाळा वडांगळीत निर्माण व्हावी, यासाठी सुदेश खुळे व नानासाहेब खुळे यांनी आमदार कोकाटे यांना विनंती केली होती. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पापूर्वी आमदार कोकाटे यांनी त्यांना सोबत घेत उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना सदर शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची होण्यासाठी शासनस्तरावरून निधी देण्याची मागणी केली होती.
शासनाने राज्यातील शाळा मॉडेल स्कूल अंतर्गत विकसित करण्याची योजना जाहीर केली. कोकाटे यांच्या प्रस्तावाची दखल घेत शासनाने मॉडेल स्कूल अंतर्गत अंतिम यादीत वडांगळी येथील जिल्हा परिषद शाळेचे नाव समाविष्ट केले आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याचा हा उपक्रम यशस्वी ठरणार आहे. पालकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे. केंद्रप्रमुख तांबेकर, मुख्याध्यापिका श्रीमती भवर यांचे या कामात मोलाचे योगदान लाभले आहे.
चौकट-
‘जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मध्यमवर्गीय व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी जास्त आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाळेत मिळणाऱ्या सुविधा गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळाव्यात. यासाठी माजी उपसरपंच नानासाहेब खुळे यांची तळमळ होती. त्यानुसार आमदार कोकाटे यांना विनंती करून मंत्रालय स्तरावर यासाठी पाठपुरावा केला. प्रयत्नांना यश मिळाल्याने समाधान वाटते.
- सुदेश खुळे, अध्यक्ष, ग्रीन व्हिजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी
फोटो- २३ वडांगळी स्कूल
वडांगळी येथील जिल्हा परिषद शाळा.
===Photopath===
230221\23nsk_35_23022021_13.jpg
===Caption===
फोटो- २३ वडांगळी स्कूल वडांगळी येथील जिल्हा परिषद शाळा.