नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 02:47 PM2018-03-17T14:47:34+5:302018-03-17T14:47:34+5:30
पेठ - मुलगी असलेल्या माता या जगातील सर्वात सुखी माता असतात. म्हणून आईने आपल्या मुलींना व शिक्षकांनी आपल्या पाल्यांना आत्मविश्वास व देशप्रेमाचे धडे द्यावेत. आदिवासी विद्यार्थ्यांनी खुप मोठे व्हावे जगाच्या पाठीवर कोठेही जा मात्र देशावर प्रेम करा. डांग सेवा मंडळ आदिवासी समाजाची सेवा करत असून कर्मवीर दादासाहेब बिडकर यांचे कार्य असेच सुरू रहावे असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड यांनी केले. वाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती अभिवादन सोहळ्यात नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांचा संस्थेच्या वतीने आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
पेठ - मुलगी असलेल्या माता या जगातील सर्वात सुखी माता असतात. म्हणून आईने आपल्या मुलींना व शिक्षकांनी आपल्या पाल्यांना आत्मविश्वास व देशप्रेमाचे धडे द्यावेत. आदिवासी विद्यार्थ्यांनी खुप मोठे व्हावे जगाच्या पाठीवर कोठेही जा मात्र देशावर प्रेम करा. डांग सेवा मंडळ आदिवासी समाजाची सेवा करत असून कर्मवीर दादासाहेब बिडकर यांचे कार्य असेच सुरू रहावे असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड यांनी केले. वाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती अभिवादन सोहळ्यात नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांचा संस्थेच्या वतीने आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महापौर रंजना भानसी यांनी सत्काराला उत्तर देतांना बिडकर यांच्या कार्याचा गौरव करतांना त्यांच्या सामाजिक कार्याचा व आदिवासी जनतेला योग्य दिशा देणारा वसा यापुढे सुरू ठेवण्याचा निर्धार केला. तसेच संस्थेत शिक्षण घेणार्या विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्याचा व आदर्श सेवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आंबेगण आश्रम शाळेने तयार केलेल्या उपक्र मातून उत्कर्षाकडे या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, केफ्रन्स कंपनीचे जनरल मॅनेजर एम.डी. देशमुख, हेमंत पद्मनाभी, नगरसेवक गणेश गीते,उपाध्यक्ष आण्णासाहेब मराठे, संचालक श्रावण म्हसदे, प्रभाकर पवार, दामू ठाकरे, जिल्हा क्रि डा अधिकारी रविंद्र नाईक, सचिव अॅड. मृणाल जोशी, पोपटराव भानसी, सुनिल जाधव,समिधा जोशी, मुंजवाडच्या सरपंच श्रीमती पी.के. जाधव, अशोक पाठक, राजेंद्र उगलमुगले, प्राचार्य हरिष आडके उपस्थित होते. प्रास्ताविक डांग सेवा मंडळाचे उपाध्यक्ष आण्णासाहेब मराठे यांनी केले. हेमलता बिडकर यांनी मानपत्राचे वाचन केले. किरण सुर्यवंशी यांनी सुत्रसंचलन व आभार मानले.