त्र्यंबक नगर परिषदेला आधुनिक जंतुनाशकऔषध फवारणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 09:05 PM2020-03-26T21:05:58+5:302020-03-26T23:07:09+5:30

त्र्यंबकेश्वर देवस्थान न्यासाचे विश्वस्त तथा त्र्यंबकेश्वर मधील एक जागरूक नागरिक दिलीप बाजीराव तुंगार यांचे चिरंजीव अभिजित दिलीप तुंगार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगर परिषदेस जंतुनाशक औषध फवारणी करण्याकरिता यंत्र विनामूल्य वापरण्यास दिले आहे.

Modern disinfectant spraying machine to Trimbak City Council | त्र्यंबक नगर परिषदेला आधुनिक जंतुनाशकऔषध फवारणी यंत्र

त्र्यंबक नगर परिषदेला देण्यात आलेल्या औषध फवारणी यंत्रासह नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, स्वप्निल शेलार, अभिजित तुंगार, कैलास चोथे, डॉ. प्रवीण निकम आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाची भीती : तुंगार यांच्याकडून विनामूल्य उपलब्ध

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर देवस्थान न्यासाचे विश्वस्त तथा त्र्यंबकेश्वर मधील एक जागरूक नागरिक दिलीप बाजीराव तुंगार यांचे चिरंजीव अभिजित दिलीप तुंगार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगर परिषदेस जंतुनाशक औषध फवारणी करण्याकरिता यंत्र विनामूल्य वापरण्यास दिले आहे.
जंतुनाशक यंत्रावर असलेल्या चक्राच्या आधारे मशीन चालू केल्यावर टँकरमधील जंतुनाशकाचा धुरळा गल्लीबोळ रस्त्यावर उडून हवेतील सूक्ष्म जंतू मरण पावतात. हे यंत्र म्हणजे शहराला जंतुनाशक औषध फवारणीसाठी लाभलेले वरदान असल्याचे नगराध्यक्ष पुरुषात्तम लोहगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. ऐन कोरोना विषाणूच्या संक्रमण काळात त्र्यंबक पालिकेला यंत्र उपलब्ध करून दिल्याने दिलीप तुंगार व अभिजित तुंगार यांचे नगरसेवक तथा माजी प्र.नगराध्यक्ष स्वप्नील (पप्पू) शेलार यांनी आभार मानले. स्वत: इंजिनिअर असलेले अभिजित तुंगार यांनी हे यंत्र तयार केले आहे. पालिकेस एकही रुपया न घेता वापरण्यासाठी हे मशीन देण्यात आले आहे. हे यंत्र एक माणूस चालवू शकतो. त्यासाठी मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता नसल्याचे तुंगार यांनी सांगितले.
१८ अश्वशक्तीपुढील कोणत्याही ट्रॅक्टरला जोडून हे यंत्र चालवता येते. या यंत्राची जंतुनाशक क्षमता २०० लिटरपासून १००० लिटरपर्यंत आहे. टाकी मध्ये २०० लिटर पाण्यामध्ये १ लिटर या प्रमाणात सोडियम हैड्रोक्लोराइड मिसळून त्याची फवारणी केल्यास पृष्ठ भागावरील व हवेमधील जंतू नष्ट करण्यास मदत होते. यावेळी झालेल्या औपचारिक कार्यक्र मात सागर उजे, कैलास चोथे, मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम आदी उपस्थित होते.

Web Title: Modern disinfectant spraying machine to Trimbak City Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.