आधुनिक हिरकणी : पतीच्या पश्चात एड्सबाधित मुलांचे निगुतीने संगोपन एकला चलो रे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:56 AM2017-12-01T00:56:56+5:302017-12-01T00:58:31+5:30

तो आणि ती आपल्या त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबासह सुखाने संसार करत असताना अचानक एचआयव्हीसारखा आजार पाऊल न वाजवता त्यांच्या आयुष्यात येतो

Modern Hirkani: After the husband, the children of AIDS-affected children should be nurtured. | आधुनिक हिरकणी : पतीच्या पश्चात एड्सबाधित मुलांचे निगुतीने संगोपन एकला चलो रे....

आधुनिक हिरकणी : पतीच्या पश्चात एड्सबाधित मुलांचे निगुतीने संगोपन एकला चलो रे....

Next
ठळक मुद्देधास्तावलेल्या एडस रूग्णांना प्रेरणाआजाराबाबत तसेच अर्थार्जनासंबंधी मार्गदर्शन नोकºया करून मुलांना उच्चशिक्षित

नाशिक : तो आणि ती आपल्या त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबासह सुखाने संसार करत असताना अचानक एचआयव्हीसारखा आजार पाऊल न वाजवता त्यांच्या आयुष्यात येतो, घरच्या कर्त्या पुरुषाला घेऊन जातो. ‘त्याच्या’मागे नवºयाकडूनच भेट मिळालेल्या एड्ससह पदर खोचून घर-संसाराची आघाडी सांभाळायला ती तयार होते.
मिळेल ती कामे करून व पैसे कमवून मुलांना वाढवते, शिकवते. संसाररूपी रथाचे एक चाक निखळूनही रथ मंजिलपर्यंत पोहोचवते... अशी कहाणी तुम्हाला कुणी सांगितली तर नक्कीच ती एखाद्या चित्रपटाची संहिता वाटेल पण प्रत्यक्षात एड्सने अशा शेकडो जणींच्या संसाराची रांगोळी विस्कटून टाकली असून, ती तितक्याच हिमतीने नव्याने रेखाटण्याचे कसब त्यांनी करून दाखविले आहे. शुक्रवारी होत असलेल्या ‘जागतिक एड्स दिना’निमित्ताने अशा आधुनिक हिरकणींच्या आयुष्य अन्य धास्तावलेल्या एडस रूग्णांना प्रेरणा देणारे ठरले आहे. एड्सबाधित व्यक्तींना विशेषत: महिलांना औषधोपचार, आजाराबाबत तसेच अर्थार्जनासंबंधी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे काम जिल्हा रुग्णालयात एआरटी विभाग व महिंद्र अ‍ॅँड महिंद्र कंपनीच्या यश फाउंडेशनमार्फत केले जात आहे. याशिवाय इतरही संस्था, संघटना एड्स जनजागृतीवर काम करत आहेत. जिल्हा रुग्णालयासह विविध ठिकाणांहून एड्सबाधित रुग्णांची माहिती मिळवून, त्यांचा संपर्क शोधून अशा रुग्णांना निरनिराळ्या उपक्रमाद्वारे जागृत करण्याचे काम यश फाउंडेशन करत आहे. पतिनिधनानंतर मुलांना वाढवताना या हिरकणी शिक्षण, कौशल्य यानुसार छोट्या मोठ्या नोकºया करून मुलांना उच्चशिक्षित करत आहेत, हे विशेष.

Web Title: Modern Hirkani: After the husband, the children of AIDS-affected children should be nurtured.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.