सौंदर्यकलेतील आधुनिक तंत्राचे धडे
By admin | Published: June 25, 2016 10:16 PM2016-06-25T22:16:52+5:302016-06-26T00:34:48+5:30
कार्यशाळा : मुंबईच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
नाशिक : महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सौंदर्य क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, उपचार पद्धती यांविषयीच्या प्रशिक्षणाची प्रात्यक्षिकांसह माहिती नाशिकमधील ब्युटीशियन्सना अॅचिव्हर्स ब्युटी असोसिएशनतर्फे स्वामी समर्थ सभागृहात आयोजित सौंदर्यकला कार्यशाळेतून देण्यात आली. या विषयांवर मुंबईतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
शहरातील सौंदर्य कलाकारांना कार्यशाळेतून अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आॅफ लेझर मशिन्स थेरपी या विषयावर डॉ. जान्हवी शाह यांनी मार्गदर्शन केले. सौंदर्य क्षेत्रात ब्युटीशियन्सनेही आधुनिक उपचार पद्धती अवलंबवावी व त्यांच्या पार्लर्समध्ये ती उपलब्ध करून देत काळानुरूप या व्यवसायात बदल करावा, असे आवाहन डॉ. शाह यांनी केले. त्यांनी मायक्र ो डर्माब्रेझर, मोनोपोलर रेडिओ फ्रिक्वेन्सी, आॅक्सिहायड्रोजेट पील, लेझर आयपीएल या मशिन्ससंदर्भातील प्रात्यक्षिके सादर केली. दुसऱ्या सत्रात हसनैन शेख यांनी एचडी हेअर कलरिंग टेक्निक्स विथ हेअर कट, पीकमल टेक्निक्स, नॅचरल इन्वर्जन अॅडव्हान्स हेअर कट्स या विषयांवर मार्गदर्शन केले. नाशिकमधील लोक कलरिंग करताना वेगळ्या पद्धतींचा चटकन अवलंब करायला तयार होत नाहीत. मात्र, बदलता ट्रेंड नाशिकमध्येही यायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक ललिता पाटोळे यांनी के ले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत वर्षा सोमय्या, कविता ठक्कर यांनी केले. सूत्रसंचालन हेमा गिरधानी व गीता पिंगळे यांनी केले.
अंजना मजेठीया यांनी आभार
मानले. (प्रतिनिधी)