आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया झाली सोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:28 PM2018-02-10T13:28:15+5:302018-02-10T13:33:49+5:30
नाशिक : गुडघेबदल शस्त्रक्रियेनंतर चालणो कमी होते, मांडी घालून बसता येत नाही, मांडीचा स्नायू कापला जातो, पीसीएच लिगामेंट कापून ऑपरेशन करणो म्हणजे, गुडघेबदल शस्त्रक्रि या प्रत्येकालाच करणे गरजेचे असते का? यासाखे असंख्य नकारात्मक प्रश्न ज्येष्ठांमध्ये बघावयास मिळतात.परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुडघेबदल शस्त्रक्रिया या सुलभ व कमी वेदनादायक झाली असल्याचे प्रतिपादन नाशिक येथील डॉ. हेमंत चौधरी यांनी केले.
ओझर येथील जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ह्यगुडघ्यांवर बोलु काहीह्ण या कार्यक्र मात ते बोलत होते. गुडघ्यांचे विकार आणि शस्त्रक्रियेविषयी अधिक माहिती देतांना डॉ. चौधरी म्हणाले, भारतीय लोकांच्या दैनंदिन काम करण्याच्या सवयींमुळे मानेच्या व कंबरेच्या मणक्यात गॅप पडणे, समोरच्याने केले म्हणून आपणही का करू नये तसेच घरच्या घरी आजारावर इलाज करणे यासारख्या प्रकारामुळे त्रास कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता असते. ज्येष्ठ नागरिकांमध्ये गुडघेविकार हा वयानुसार होणारा त्रास असून आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुडघाबदलण्याची शस्त्रक्रिया सोपी झाली आहे. मांडीचा स्नायु न कापता सब व्हास्टर्स अॅपरोच पध्दतीचे ऑपरेशन करणे तसेच ऑपरेशननंतर फिजिओथेरपीची असलेली गरज याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचेही त्यांनी निरसन केले. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित मनोरंजनाच्या कार्यक्रमातील विनोदी कलाविष्कारांनी उपस्थित सर्वच हासून लोटपोट झाले. प्रास्ताविक सूर्यभान ठाकरे यांनी केले. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले. दिनकर वाक्चौरे यानी सूत्रसंचालन केले.