देवळाली कॅम्प रेल्वेस्थानक होणार आधुनिक
By admin | Published: June 20, 2016 11:23 PM2016-06-20T23:23:08+5:302016-06-21T00:19:25+5:30
देवळाली कॅम्प रेल्वेस्थानक होणार आधुनिक
देवळाली कॅम्प : देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकाला अत्याधुनिक करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार असून, त्यानिमित्त रेल्वेचे वाणिज्य निरीक्षक आर.एस. गोसावी यांनी भेट देऊन पाहणी केली.
देवळाली रेल्वेस्थानकावर प्रवाशांना तत्काळ तिकिटासाठी आॅटीव्हीएम मशीन लावण्यात आले असून, लवकरच उपाहारगृहाची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले. यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रतन चावला यांनी भुसावळ-पुणे ही रेल्वे गाडी त्याच वेळेला पुणे-भुसावळ अशी सुरू केल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होईल, असे स्पष्ट केले. तसेच कामायनी, गीतांजली व जनशताब्दी या गाड्यांना देवळालीत थांबा दिल्यास नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी होऊन देवळाली स्थानकात लष्कराचे जवान, व्यापारी व पंचक्रोशीतील रहिवाशांची मोठी सोय होईल, अशी मागणी चावला यांनी केली. यावेळी स्टेशन प्रबंधक आर. एस. बागुल, पर्यवेक्षक ए. एन. खंडारे, एस. बी. सिन्हा, अजय तिवारी, के. बी. खैरनार, शमशोद्दीन पिरजादा आदि उपस्थित होते. (वार्ताहर)