आधुनिकीकरणामुळे लोहार व्यवसायाला अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 10:30 PM2020-06-21T22:30:29+5:302020-06-22T00:02:51+5:30

सायखेडा : तिसऱ्या पिढीत अलौकिक कारागिरीमुळे जगण्याचे साधन बनलेला घिसाडी समाजाचा लोहारकीचा व्यवसाय बदलत्या युगाच्या नांदीत अडचणीत येऊ लागला आहे. शासनाकडून समाजाची अवहेलना होत असल्याने प्रगत पिढी या व्यवसायाकडे काणाडोळा करीत असल्याची खंत लोहार व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. परिणामी हा व्यवसाय व कला सांभाळणारी पिढी लुप्त होत असल्याचे विदारक चित्र सध्या ग्रामीण भागात बघावयास मिळत आहे.

Modernization has disrupted the blacksmith business | आधुनिकीकरणामुळे लोहार व्यवसायाला अवकळा

कागदाच्या ताडपत्री टाकून थाटलेल्या झोपडीत घिसाडी समाजाच्या व्यवसायाला लागलेले ग्रहण, हाताला कामात येत नसल्याने सुनीसुनी झोपडी.

googlenewsNext
ठळक मुद्देविदारक चित्र : घिसाडी समाजाची आर्थिक फरफट कायम; आवक मंदावली

सायखेडा : तिसऱ्या पिढीत अलौकिक कारागिरीमुळे जगण्याचे साधन बनलेला घिसाडी समाजाचा लोहारकीचा व्यवसाय बदलत्या युगाच्या नांदीत अडचणीत येऊ लागला आहे. शासनाकडून समाजाची अवहेलना होत असल्याने प्रगत पिढी या व्यवसायाकडे काणाडोळा करीत असल्याची खंत लोहार व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. परिणामी हा व्यवसाय व कला सांभाळणारी पिढी लुप्त होत असल्याचे विदारक चित्र सध्या ग्रामीण भागात बघावयास मिळत आहे.
आधुनिक युगात मशिनरीचा वापर सुमार वाढला. यामुळे हस्तकलेला जास्तीचा भाव उरला नाही पर्यायाने वडिलोपार्जित कला लोप पावण्याच्या मार्गावर आहे. समाजाच्या उपजीविकेचे परंपरागत साधन म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी आणि घरगुती उपयोगाची लोखंडाची हत्यारे, अवजारे बनविण्यात घिसाडी समाजाच्या या व्यवसायात ६० ते ७० टक्के योगदान महिलांचे आहे. त्यासाठी भट्टी लावणे, तप्त लाल लोखंडावर गरजेप्रमाणे ७ ते १५ किलो वजनाचे घण मारणे, ग्राइंडर मशीन नसल्यास काणसीने जोर लावून हत्यारे घासणे, बनवलेली हत्यारे, अवजारे आसपासच्या गावांतील आठवडी बाजारात जाऊन विकणे ही कामे महिलाच करतात. शिवाय रोज सकाळी पाणी उपलब्ध करण्यापासून सगळी घरगुती कामे करणे, मुले सांभाळणे, त्यांना शाळेत पाठवणे ही कामेही त्यांना करावीच लागतात. उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी त्यांना पहाटे चार ते रात्री बारापर्यंत अंगमेहनत करावी लागते, तेव्हा कुठे त्यांना दोनशे रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते. सध्या कोरोनात परिस्थिती बिकट बनली असल्यामुळे या समाजाला मिळणारी मिळकत थंडावली आहे.भटकंती करणाºया घिसाडी समाजाला गरीब परिस्थितीचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत असल्याने मागील काही वर्षांपासून समाजाचे जीवनमान ढासळले आहे. शासन कोणतेही आर्थिक साहाय्य करीत नाही. पर्यायाने समाज शासकीय योजनांपासून वंचित राहत असून, समाजाची शासनाकडून अवहेलना होत आहे.
- संतोष पवार,
लोहार व्यावसायिक, भेंडाळी

Web Title: Modernization has disrupted the blacksmith business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.