मोदी सरकार कामगार विरोधी
By admin | Published: September 20, 2015 10:58 PM2015-09-20T22:58:49+5:302015-09-20T22:59:17+5:30
जे. ए. मजुमदार : नोव्हेंबरमध्ये रेल रोको
सिडको : केंद्रातील मोदी सरकार हे कामगार विरोधी असून, कामगारांच्या विरोधात धोरणे अवलंबत आहेत. त्यामुळेच कामगार अडचणीत आल्याने कामगारांच्या न्याय हक्कासाठी देशपातळीवर जनआंदोलन उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नोव्हेंबरमध्ये रेल्वे कर्मचारी संपावर जातील, अशी माहिती सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जे. ए. मजुमदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सीटू भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी मजुमदार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार हे कामगार आणि शेतकरी विरोधी आहे. त्यांच्या हिताचा विचार न करता त्यांच्यावर अन्याय करत असून कामगार, शेतकरी संकटात सापडले आहेत. याचा निषेध करण्यासाठी सीटूने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. नुकतेच डाव्या पक्षांनी केंद्राच्या विरोधात गेल्या २ सप्टेंबर रोजी आंदोलन छेडले होते. हेच आंदोलन आता अधिक व्यापक केले जाणार आहे. केंद्र सरकार आंदोलन करू नका, असे आवाहन करीत असून, दुसरीकडे मात्र कामगार विरोधी निर्णय घेत आहेत. सरकारच्या या धोरणाविरोधात जनआंदोलन छेडणार असल्याचेही मजुमदार म्हणाले. दरम्यान, या पुढील काळात सरकारच्या विरोधात मजूर संघ आमच्याबरोबर असल्याचा दावा मजुमदार यांनी केला. याप्रसंगी श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे आदि मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)