मोदींनी वांगेसटची केली कांदेसट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:13 AM2019-04-23T01:13:00+5:302019-04-23T01:13:42+5:30

नाशिकच्या कांद्याचा धसका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विशेष दक्षता घेण्यात आली आणि मोदी यांनीदेखील कांद्याच्या भावासाठी काय केले याचे रसभरीत वर्णन केले खरे मात्र भारतीय परंपरेत कांदे खाण्याचा विशेष दिवस असतो त्याला चंपाषष्ठी म्हणतात,

Modi made Congestion! | मोदींनी वांगेसटची केली कांदेसट!

मोदींनी वांगेसटची केली कांदेसट!

Next

नाशिक : नाशिकच्या कांद्याचा धसका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विशेष दक्षता घेण्यात आली आणि मोदी यांनीदेखील कांद्याच्या भावासाठी काय केले याचे रसभरीत वर्णन केले खरे मात्र भारतीय परंपरेत कांदे खाण्याचा विशेष दिवस असतो त्याला चंपाषष्ठी म्हणतात, असे सांगितल्याने जाणकारांना धक्का बसला. चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याच्या भरताचे आपल्याकडे महत्त्व आहे. चातुर्मासानंतर या दिवशी वांग्याबरोबरच कांदे आहारात सुरू केले जात असले तरी दिवसभर कांदे खाण्याचा मात्र तो दिवस नसतो. त्यामुळे मोदी यांच्या नव्या संस्कृती शोधाने तो चर्चेचा विषय ठरला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा नाशिक जिल्ह्णातील पिंपळगाव येथे होणार असल्याने शेतकऱ्यांच्या कांदा आंदोलनाचा त्यांनी आधीच धसका घेतला होता. त्यामुळे आंदोलने कशी टाळता येतील यावर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने विशेष काळजी घेतली आणि काटेकोर तपासणीत कोणी डोक्यावर ऊन ओकत असल्याने ऊन लागू नये म्हणून जवळ कांदा ठेवावा तर तेही नाकारण्यात आले होते. परंतु अपेक्षेप्रमाणे मोदी यांनी सभेत कांद्याचा विषय काढलाच. कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने निर्यात शुल्क कमी केले तसेच कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन शुल्क लागू केले अशाप्रकारची माहिती देतानाच ते संस्कृतीवर घसरले.
चंपाषष्ठी म्हणजे खंडेरावाच्या नवरात्राचा अखेरचा दिवस या दिवशी वांग्याच्या भरताचा नैवेद्य दाखवला जातो, तर चातुर्मासात कांदे- लसूण खाणे वर्ज्य असल्याने त्या आधी म्हणजे कांदे नवमीला कांद्याचे पदार्थ तयार केले जातात. तथापि, दिवसभर कांदे खाण्याची मात्र कोणतीही परंपरा नाही, असे जाणकार म्हणतात. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी म्हणजे नवमीला कांदे नवमी म्हणतात. त्या दिवसानंतर कांदा वर्ज्य असतो. तो चंपाषष्ठीलाच सुरू करतात. अनेक जण चंपाषष्ठीला वांगेसट म्हणतात. परंतु मोदी यांनी या दिवसाचे मात्र कांदेसटात रूपांतर केल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
परंपरेचे रसभरीत वर्णन
आपल्याकडे वर्षातील एक दिवस असतो. त्या दिवशी दिवसभर कांदे खात असतात. त्याला चंपाषष्ठी म्हणतात असे सांगून मोदी यांनी या परंपरेचे रसभरीत वर्णन केले. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा म्हणून किती चांगली परंपरा सुरू केली. त्यात किती समाजहिताचा व्यापक विचार होता असे सांगून त्यांनी संस्कृतीचे गुणगान केले, परंतु त्यामुळे अनेकांना धक्का बसला.

Web Title: Modi made Congestion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.