मोदी-पवार भेटीनेही राजकीय घडामोडीची शक्यता कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:45+5:302021-07-18T04:11:45+5:30

नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडीला नाइलाजाने एकत्र राहावेच लागणार असल्याचे सांगितले. दिल्लीत ...

Modi-Pawar meeting is also unlikely to lead to political developments | मोदी-पवार भेटीनेही राजकीय घडामोडीची शक्यता कमीच

मोदी-पवार भेटीनेही राजकीय घडामोडीची शक्यता कमीच

Next

नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडीला नाइलाजाने एकत्र राहावेच लागणार असल्याचे सांगितले. दिल्लीत लाेकसभा आणि राज्यसभा अधिवेशनापूर्वी काही विषयांवर मोठे नेते चर्चा करतात हा प्रघात आहे. त्यामुळे पवार यांनी मोदी यांची भेट घेतली, त्यात अन्य विषयांवरदेखील चर्चा झाली असावी. मात्र, आणखी काही खास चर्चा झाली असेल तर माहिती नाही, असे सांगून पाटील म्हणाले की, या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडी होण्याची शक्यता कमीच आहे.

केंद्रातील मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज आहेत. त्यात माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला ईडीची नोटीस बजावण्यात आली. त्यावर बोलताना दोन घटनांचा एकत्र अर्थ लावण्याचे त्यांनी खंडन केले. केवळ मुंडे यांच्याच नव्हे, तर अन्य कारखान्यांवरदेखील कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुळात पंकजा मुंडे नाराज नसून त्यांचे कार्यकर्ते नाराज होते, त्यासंदर्भात त्यांची समजूत काढल्याचे त्यांचीही पंकजाताईंनी समजूत काढली आहे, असे ते म्हणाले.

शिवसेनेबाबतही बोलताना पाटील यांनी आमचे शिवसेनेशी अथवा राष्ट्रवादीशीही वैर नाही. राज्यात होणारी आंदोलने ही सरकारच्या विरोधात असतात. उद्धव ठाकरे हे सरकारचे प्रमुख असल्याने आंदाेलने त्यांच्या विरोधात होतात, असे सांगून ते म्हणाले की, शिवसेनेने भाजपशी युती करून निवडणुका लढविल्या आणि नंतर मुख्यमंत्रिपद मिळाले नाही म्हणून वेगळ्या विचारांच्या पक्षाबरोबर सरकार स्थापन केले, हे मान्य नाही. मात्र, येता-जाता अपमान सहन करूनही सरकार चालवताहेत, कारण सत्ता ही फेविकाॅल आहे, असे ते म्हणाले. आज तरी सेनेबरोबर सरकार स्थापन करणे शक्य वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.

इन्फो..

ईडीच्या विषयावर सारवासारव

चूक केली नसेल तर घाबरायचे कारण नाही. मात्र, रात्रीतून कोणालाही अटक होऊ शकते असे गप्पांच्या ओघात सांगणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी नंतर मात्र सारवासारव केली. रात्रीतून अटक म्हटलो; परंतु कोणाचे नाव घेतले नव्हते. खूप जणांची चौकशी सुरू असून, ज्या अटकेच्या दिशेने आहेत, असे ते म्हणाले.

इन्फो..

राज ठाकरे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व

मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा सुरू असून, राज ठाकरे, तसेच चंद्रकांत पाटील शासकीय विश्रामगृहात उतरल्याने युतीची चर्चा सुरू झाली. मात्र, राज ठाकरे यांनी व्यापक राजकारण केले, परप्रातीयांच्या मुद्याकडे याच दृष्टीने बघितले पाहिजे अशा व्यापक राजकारणातून युती होऊ शकते असे ते म्हणाले. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Modi-Pawar meeting is also unlikely to lead to political developments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.