मोदींनी मालेगावातही स्वच्छतेसाठी यावे : ओवेसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 01:17 AM2019-10-13T01:17:40+5:302019-10-13T01:18:07+5:30
चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रकिनारी केलेल्या स्वच्छतेची खिल्ली उडवतानाच मालेगाव शहरासाठी काहीच करण्यात आले नाही, किमान मोदींनी शहर स्वच्छतेसाठी यावे, असा सल्ला एमआयएमचे राष्टÑीय अध्यक्ष असदउद्दीन ओवेसी यांनी येथील अली अकबर रुग्णालयासमोरील प्रांगणात आयोजित प्रचार सभेत बोलताना दिला.
मालेगाव : चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रकिनारी केलेल्या स्वच्छतेची खिल्ली उडवतानाच मालेगाव शहरासाठी काहीच करण्यात आले नाही, किमान मोदींनी शहर स्वच्छतेसाठी यावे, असा सल्ला एमआयएमचे राष्टÑीय अध्यक्ष असदउद्दीन ओवेसी यांनी येथील अली अकबर रुग्णालयासमोरील प्रांगणात आयोजित प्रचार सभेत बोलताना दिला.
औरंगाबाद येथे शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेल्या टिकेचा समाचार घेताना ओवेसी यांनी सांगितले, हिरवा रंग हा राष्ट्रध्वजाचा अतुट भाग आहे. त्यामुळे तो संपविण्याचा विचार मनातुन काढुन टाका. मोदी सरकार आरसीईपी करारनामा करू पाहत आहे. त्यामुळे चीन, बांगलादेश, व्हिएतनाम येथून कापड आयात केले जाईल. सरकार हा करारा करण्यात यशस्वी झाले तर देशाचे वस्त्रोद्योग क्षेत्र संपुष्टात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्याला विरोध करणारा ठरावही यावेळी मांडण्यात आला. कॉँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, कॉंग्रेस संपली असुन जगातील कुठलेही इंजेक्शन काँग्रेसला पूर्वावस्थेत आणु शकत नाही. मालेगाव शहरात स्वच्छते अभावी क्षय रोगाच्या रु ग्णांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील विकासाकडे सरकारचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. असा आरोपही त्यांनी केला.