शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना सहन करणार नाही : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 03:48 PM2020-01-13T15:48:45+5:302020-01-13T15:49:09+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच राज्य निर्माण केले होते. त्यांनी कधीही धर्मभेद व जातिभेद केला नाही त्यांच्याकडे काम करणाऱ्या सैनापतीमध्ये मुस्लिम सेनापतीची संख्या लक्षणीय होती. राज्याचा कारभार करत असतांना शेतकऱ्यांच्या काडीला देखील हात लावता कामा नये अशी

Modi's comparison with Shivaji Maharaj will not be tolerated | शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना सहन करणार नाही : छगन भुजबळ

शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना सहन करणार नाही : छगन भुजबळ

Next
ठळक मुद्देपुस्तकावर तात्काळ बंदीची मागणी

लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : या अगोदर देशात काहींची तुलना कधी प्रभुराम चंद्र तर कधी शिवशंभू बरोबर केली गेली. त्याकडे दुर्लक्ष केले गेले असेल मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना केली जात असेल तर जनता कदापी सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना कदापी शक्य नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. त्या पुस्तकाच्या प्रकाशनावर व विक्रीवरही तात्काळ बंदी घातली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.


नाशिक येथे प्रसिद्धीमाध्यमांशाी बोलताना भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच राज्य निर्माण केले होते. त्यांनी कधीही धर्मभेद व जातिभेद केला नाही त्यांच्याकडे काम करणाऱ्या सैनापतीमध्ये मुस्लिम सेनापतीची संख्या लक्षणीय होती. राज्याचा कारभार करत असतांना शेतकऱ्यांच्या काडीला देखील हात लावता कामा नये अशी व्यवस्था होती. आज मात्र मोदी सरकारकडून व्यवस्था पायदळी तुडविली जात आहे. ते ज्या प्रकारे कायदे करत आहे. त्यात जनहित नसून कुठल्यातरी एका विशिष्ट धर्माच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे. देशात विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहे. जेएनयु सारख्या देशाच्या नामांकित विद्यापीठात हिंसाचाराच्या घटना घडत आहे. त्यावर कुठलीही कारवाई होतांना दिसत नाही. असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेत असे कधीही घडलं नाही त्यांचे राज्य हे रयतेच राज्य होते. त्यांच्या नावावरच निवडणुकीत मते मागितली गेली. त्यामुळे जनतेत रोष असणे सहाजिकच आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना कदापी शक्य नसल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, कुठल्याही लेखकाने भाट गिरी तरी किती करावी आणि ती करत असतांना आपण कुठल्या व्यक्तीची तुलना कोणाशी करत आहोत याचे भान ठेवायला हवे, त्यामुळे अशा प्रकाशनांवर तसेच पुस्तकांवर बंदी घातली पाहिजे असे स्पष्ट मतही शेवटी भुजबळ यांनी व्यक्त केले.

Web Title: Modi's comparison with Shivaji Maharaj will not be tolerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.