मोदींच्या सभेने ‘महाजनादेश’चा आज समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:50 AM2019-09-19T00:50:53+5:302019-09-19T00:51:23+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

 Modi's rally ends Mahajanesh today | मोदींच्या सभेने ‘महाजनादेश’चा आज समारोप

मोदींच्या सभेने ‘महाजनादेश’चा आज समारोप

Next

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. तपोवनात होणाऱ्या या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्या निमित्ताने येत्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग या सभेद्वारे फुंकले जाणार आहे.
पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा आरूढ झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे गुरुवारी (दि.१९) प्रथमच नाशिकला येणार आहेत. मोदी हे सर्वप्रथम विमानाने ओझरला येणार असून, तिथून हेलिकॉप्टरने पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलातील हेलिपॅडवर येणार असून, तिथून सभास्थानी दाखल होणार आहेत. या दौºयात ते केवळ समारोपाच्या सभेत भाषण करणार असून, अन्य कोणताही कार्यक्रम त्यांच्या दौºयात होणार नाही. या सभेसाठी राज्य मंत्री मंडळातील अनेक मंत्री येणार असून त्यांचे रात्री उशिरा आगमन होत होते.
नाशिकमध्ये सध्या पावसाळी वातावरण असून बुधवारी (दि. १८) मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेत रोड शोच्या वेळीच पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरूवारी होणाºया मोदी यांच्या सभेवरही पावसाचे सावट आहे.
जीवघेणी फोटोग्राफी :
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने हातातील मोबाइलने अनेकांनी चित्रीकरण केले. परंतु त्याचबरोबर घराच्या बाल्कनी आणि छतावरून करण्यात आले. सध्या ही तरुणाईची आवड असली तरी उत्तमनगरनजीक एका इमारतीच्या छतावरून अशा धोकादायक पद्धतीने छायाचित्रण करणे हे निश्चितच धोकादायक ठरू शकले असते.
स्वागताच्या वैविध्यपूर्ण तºहा
४कुठे गुलाब पाकळ्यांचा वर्षाव, ढोल-ताशे, कुठे भव्य हार, कुठे कागदी पुष्पांची उधळण, कुठे लेजीम, कुठे क्रेनवर विद्यार्थिनींचा रोप मल्लखांब अशा वैविध्यपूर्ण तºहांनी सिडकोतून आलेल्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. सिडकोतील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घरांच्या बाल्कनी आणि गच्चींमध्ये उभ्या असलेल्या नागरिकांकडून मुख्यमंत्र्यांवर फुलांचा वर्षाव केला जात होता.

Web Title:  Modi's rally ends Mahajanesh today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.