सावतावाडीच्या सरपंचपदी मोहिते; वडनेरच्या सरपंचपदी ठाकोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:39 PM2020-01-10T22:39:50+5:302020-01-11T01:02:00+5:30

वडनेर व सावतावाडी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत वडनेरला विजयी पॅनलने ११ जागा जिंकून सत्ता काबीज करीत ग्रामविकास पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. सरपंचपदी अर्जुंनसिंह ठाकोर यांची निवड झाली आहे. सावतावाडी ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनल व विकास पॅनलला प्रत्येकी चार जागा मिळाल्या, तर सरपंचपदी ग्रामविकास पॅनलचे दीपक मोहिते यांची निवड झाल्याने ग्रामविकास पॅनलचे पारडे जड भरले आहे.

Mohit takes over as patron saint of Sawatwadi; Thakor to be the sarpanch of Wadner | सावतावाडीच्या सरपंचपदी मोहिते; वडनेरच्या सरपंचपदी ठाकोर

वडनेर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अर्जुनसिंह ठाकोर यांची थेट सरपंचपदी निवड झाल्यानंतर विजयोत्सव साजरा करताना सोमनाथ अहिरे, भरत करंकाळ, प्रवीण जैन व ग्रामस्थ.

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : वडनेरला विजयी पॅनल; सावतावाडीला ग्रामविकास विजयी

मालेगाव : तालुक्यातील वडनेर व सावतावाडी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत वडनेरला विजयी पॅनलने ११ जागा जिंकून सत्ता काबीज करीत ग्रामविकास पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. सरपंचपदी अर्जुंनसिंह ठाकोर यांची निवड झाली आहे. सावतावाडी ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनल व विकास पॅनलला प्रत्येकी चार जागा मिळाल्या, तर सरपंचपदी ग्रामविकास पॅनलचे दीपक मोहिते यांची निवड झाल्याने ग्रामविकास पॅनलचे पारडे जड भरले आहे.
सावतावाडी व वडनेर ग्रामपंचायतीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. शुक्रवारी तहसील कार्यालयातील सभागृहात मतमोजणी करण्यात आली. सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. वडनेर ग्रामपंचायतीच्या ११ जागा विजयी पॅनलने जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी अर्जुंनसिंह ठाकोर यांनी (८७६) मते मिळवून राहुल चौधरी (५३३) यांचा पराभव केला आहे, तर ग्रामपंचायत सदस्यपदी सोमनाथ अहिरे (३१७), भरत करंकाळ (३०६), संगीता कुलकर्णी (३३८), अशोक पवार (११३), प्रवीण जैन (२४०), कविता चौधरी (२३५) यांची निवड झाली आहे. यापूर्वीच बापू पवार, लता बागुल, कल्पना अहिरे, विमल सोनवणे, सोनाली पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी मोहन गायकवाड यांनी कामकाज पाहिले. सावतावाडी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी दीपक मोहिते (४६७) यांची निवड झाली आहे, तर शंकर शेवाळे यांना (४३८) मते मिळाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. केवळ २९ मतांनी मोहिते विजयी झाले आहे. ग्रामविकास व विकास पॅनलला प्रत्येकी चार जागा मिळाल्या आहेत. सावतावाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी गोरख बुनगे (२२९), बापू शिंदे (१५९), भारत वेताळ (१६८), रविंद्र पवार (२७९), उषा शेवाळे (१४५) मते मिळवून निवड झाली आहे. तर यापूर्वीच रंजना व्यवहारे, नर्मदाबाई अहिरे, हिरूबाई पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. सावतावाडीची एक जागा रिक्त आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी दौलत गणोरे यांनी कामकाज पाहिले. निवडणूक प्रक्रिया लिपिक राहुल देशमुख, दिलीप मोरे यांनी पार पाडली.
वडनेर व सावतावाडी ग्रामपंचायतीचा निकाल ऐकण्यासाठी ग्रामस्थांनी तहसील कार्यालय आवारात गर्दी केली होती. निकाल जाहीर होताच समर्थकांकडून गुलालाची उधळण व फटाके फोडून जल्लोष साजरा केला जात होता. छावणी पोलिसांनी मतमोजणी काळात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Mohit takes over as patron saint of Sawatwadi; Thakor to be the sarpanch of Wadner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.