मतदार यादीतून नाव वगळल्याने मोजाड यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 01:53 AM2021-08-04T01:53:59+5:302021-08-04T01:54:30+5:30
देवळाली छावणी परिषदेचे मतदार यादीतून शिगवे बहुला, सोनेवाडी व चारणवाडी येथील मतदारांची नावे वगळल्याने येथील छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड हे सोमवारपासून (दि.२) छावणी परिषदेच्या कार्यालयासमोर शिगवे बहुला ग्रामस्थांसह उपोषणास बसले. त्यांना विविध संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
देवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषदेचे मतदार यादीतून शिगवे बहुला, सोनेवाडी व चारणवाडी येथील मतदारांची नावे वगळल्याने येथील छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड हे सोमवारपासून (दि.२) छावणी परिषदेच्या कार्यालयासमोर शिगवे बहुला ग्रामस्थांसह उपोषणास बसले. त्यांना विविध संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
छावणी प्रशासनाने जून महिन्यात नवीन मतदार याद्या जाहीर करताना सर्वोच्च न्यायालयाने २०१६ मध्ये दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करताना वाॅर्ड क्रमांक सातमधील ४८०० मतदारांची नावे वगळली आहेत. वास्तविक राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेला मतदानाचा हक्क हा रद्द करणे योग्य नसून छावणी परिषद हद्दीतील नागरिकांना हक्क पुन्हा मिळावा, याशिवाय शिगवेबहुला चारणवाडी, आंबाडवाडी येथील नागरिकांना नगरभूमापन योजना लागू घरमालकांच्या नावे मिळकत सनद मिळावी यासाठी हे उपोषण आहे. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे एकनाथ शेटे, गिरीश पालवे, मधुसूदन गायकवाड, माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे, तानाजी करंजकर, भगवान कटारिया, दिनकर पाळदे, जीवन गायकवाड, प्रमोद मोजाड, चंद्रकांत गोडसे, राजू चौधरी, साहेबराव चौधरी, नितीन शिंदे, मंगेश निसाळ, संतोष मेढे, राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष रतन चावला, सोमनाथ खताळे, बाळासाहेब आडके, चंद्रकांत कासार आदींनी पाठिंबा दिला. शिगवेबहुला, चारणवाडी, आंबाडवाडी येथील ग्रामस्थ घरपट्टीच्या पावत्या घेऊन उपोषण स्थळी येऊन आपला पाठिंबा व्यक्त करीत होते.