गणेशोत्सव, मोहरमच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांचे मॉकड्रिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 06:52 PM2018-09-08T18:52:16+5:302018-09-08T18:52:32+5:30
नाशिक : आगामी गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेनिहाय मॉकड्रील सुरू करण्यात आले आहे़ दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल तसेच पोलीस ठाण्यातील प्रभारी व उपविभागीय अधिकारी यांचा या मॉकड्रीलमध्ये सहभाग आहे़

दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलातील जवान व पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुकास्तरावर तसेच पोलीस मुख्यालय परिसरात कोम्बिंग आॅपरेशन तसेच दंगल नियंत्रणाची प्रात्यक्षिके केली जात आहेत़ या बरोबरच गोळीबार मैदानावर गोळीबाराचा सरावही करण्यात येत आहे़
यावेळी अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपाधीक्षक सुरेश जाधव, अतुल झेंडे, सचिन गोरे, माधव पडिले, सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक अशोक करपे, मुख्यालयाचे राखीव पोलीस उपनिरीक्षक साहेबराव जाधव यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.