लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेची फसवणूक करून विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 06:15 PM2018-09-02T18:15:44+5:302018-09-02T18:20:59+5:30
नाशिक : पतीला सोडून दे, मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे अमिष दाखवून एका संशयिताने विवाहित महिलेस तिच्या पतीविरोधात कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल करण्यास भाग पाडले़ यानंतर विवाहितेच्या पतीकडून मिळालेली रक्कम व महिलेचे सोन्याचे दागिने लाटून तिचा विनयभंग केल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली आहे़ पिडीतेने पैशांची मागणी केली असता या संशयिताने तिच्या दोन मुलींना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने या महिलेने दिपक जिभाऊ ठाकरे (रा. बालाजी रेसीडेन्सी, अशोकनगर, सातपूर) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी फाटा परिसरात विवाहिता दोन लहान मुलींसमवेत राहते़ जुलै २०१७ मध्ये तिच्या मैत्रिणीने संशयित ठाकरेसोबत ओळख करून देत मोबाईल नंबर दिला़ यानंतर ठाकरे याने विवाहितेस नियमित फोन व बाहेर घेऊन जाऊ लागला़ त्र्यंबकेश्वर येथील हॉटेलमध्ये नेऊन ‘तू, नवऱ्याला सोडून दे मी तुझ्याशी लग्न करतो’ असे अमिष दाखवून पतीविरोधात तक्रार करण्यास सांगितले़ त्यानुसार या विवाहितेने मार्च २०१८ मध्ये पतीविरोधात महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दाखल केली़ यानंतर पती-पत्नीत वाद झाल्याने ठाकरे याने विवाहितेस पाथर्डी फाटा परिसरात भाडेतत्वावर फ्लॅट घेऊन दिला़
संशयित ठाकरे याने विवाहितेसोबत गोड बोलून तिचा विश्वास संपादन करून तिच्याकडील दीड तोळे सोन्याचे चेन, पाच ग्रॅमची अंगठी कर्ज झाल्याने तात्पुरत्या स्वरुपात परत देण्याच्या बोलीवर घेऊन गेला़ तसेच महिलेच्या पतीने दिलेले एक लाख रुपयांपैकी ९० हजार रुपये काही ना काही कारण दाखवून घेऊन गेला़ यानंतर या महिलेला भेटण्यास टाळाटाळ करून लागल्याने त्यास विचारणा केली असता मारहाण करून तिच्या मुलींना जीवे मारण्याची धमकी दिल्याने तीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली़ यावेळी माफी मागून परत त्रास देणार नाही असे सांगून समझोता केला़ यानंतर काही दिवसांनी पुन्हा या विवाहितेस ठाकरे त्रास देऊ लागला व लग्न करणार नाही तसेच पैसेही परत करणार नाही असे म्हणून धमकी देत असल्याने महिलेने संपर्क तोडला़
२२ आॅगस्ट २०१८ रोजी महिला मुलींसोबत घरी असताना ठाकरे हा महिलेच्या घरी गेला तिचा विनयभंग केला, यावेळी महिलेने ओरड केल्याने तो फरार झाला़े दरमयान या प्रकराचा जाब विचारण्यासाठी २७ आॅगस्ट रोजी ही महिला गेली असता संशयित ठाकरे याने पुन्हा धमकी दिली तसेच पैसे परत करणार नसल्याचे सांगितले़ पिडीत महिलेने ही बाब पतीस सांगितली असता त्याने धीर दिल्याने संशयित ठाकरेविरोधात फिर्याद दिली़