धक्कादायक! शारीरिक संबंधांना नकार दिल्याने पीडितेचे अश्लिल फोटो वायरल करून विनयभंग
By नामदेव भोर | Published: September 20, 2022 04:57 PM2022-09-20T16:57:43+5:302022-09-20T16:57:43+5:30
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रोहन बंजारा याने टाकळी परिसरातील एका फ्लॅटमध्ये पीडितेला गाठून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र पिडितेने नकार दिल्याने संशयित रोहण बंजारा याने तिला तिचे न्यूड फोटो व्हायरक करण्याची धमकी दिली होती.
नाशिक : शरीर सुखाची मागणी केल्यानंतर नकार दिल्याने तरुणीचे अश्लिल फोटो सोशल मिडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित रोहन बंजारा (रा. नंदुरबार) याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ जुने ते १९ सप्टेंबर या कालावधीत घडली असल्याचे समजते.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रोहन बंजारा याने टाकळी परिसरातील एका फ्लॅटमध्ये पीडितेला गाठून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र पिडितेने नकार दिल्याने संशयित रोहण बंजारा याने तिला तिचे न्यूड फोटो व्हायरक करण्याची धमकी दिली होती. एवढेच नाही, तर त्याने तिचे अश्लील फोटो आणि मॅसेज मोबाईल फोनच्या माध्यमाने इन्स्टाग्राम अकाउंटवरून पीडितेच्या मित्र-मैत्रिणी आणि भाऊ व बहिणी यांना पाठवले.
याप्रकरणी पीडितेने भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसानी रोहन बंजारा याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल कला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ठाकूर करीत आहेत.