बसस्थानकावर जाणाऱ्या युवतीचा पाठलाग करून विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 06:45 PM2019-04-05T18:45:38+5:302019-04-05T18:45:55+5:30
त्याने ‘तू माझ्याशी बोलत नाही, तू फक्त माझीच आहे’ असा संवाद साधत युवतीच्या शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात असलेल्या हॉटेल जत्रा समोर बस स्थानकावर जाणाऱ्या युवतीचा हात धरून विनयभंग केल्याची घटना काल गुरु वारी (दि.४) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत पीडितेच्या तक्र ारीनुसार आडगाव पोलीस ठाण्यात संशयित गणेश ठकसेन सहाणे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की परिसरात राहणारी युवती काल गुरु वारी सकाळच्या सुमाराला जत्रा हॉटेल समोर असलेल्या बसस्थानकावर येत असताना संशियत सहाणे त्याठिकाणी आला, त्याने ‘तू माझ्याशी बोलत नाही, तू फक्त माझीच आहे’ असा संवाद साधत युवतीच्या शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी संशयित सहाणेविरूध्द पोलिसांनी फिर्यादीवरून विनयभंगााचा गुन्हा दाखल केला आहे. असे म्हणून तिच्या शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संशयीत पसार झाला असून आडगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत.