रंग लावण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 01:46 PM2019-03-26T13:46:43+5:302019-03-26T13:50:06+5:30
आडगाव शिवारातील नांदूर नाका परिसरात घटना घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसात जेलरोड परिसरात राहणाऱ्या प्रकाश महिंद्रा चव्हाण, विवेक अशोक रसाळ तसेच नांदूरनाका येथील विकी उर्फ शरद अशोक खैरनार या तिघांवर गुन्हा दाखल
पंचवटी :रंगपंचमी निमित्ताने रंग लावण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका अल्पवयीन मुलीला रंग लावताना तिच्या शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तिघा संशयित आरोपी विरुद्ध विनयभंग तसेच लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.
काल सोमवारी (दि.25) दुपारी आडगाव शिवारातील नांदूर नाका परिसरात घटना घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसात जेलरोड परिसरात राहणाऱ्या प्रकाश महिंद्रा चव्हाण, विवेक अशोक रसाळ तसेच नांदूरनाका येथील विकी उर्फ शरद अशोक खैरनार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आडगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काल रंगपंचमी निमित्ताने दुपारी नांदूर नाका शिवारात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या घरी तिघा संशयित आरोपींनी अनधिकृतपणे प्रवेश करत रंग लावण्याच्या बहाण्याने शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. सदर घटनेनंतर त्या अल्पवयीन मुलीने आडगाव पोलिसात धाव घेऊन झाल्या प्रकाराची माहिती दिल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींमध्ये रसाळ नामक युवकावर यापूर्वी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.