अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 01:43 AM2021-07-31T01:43:17+5:302021-07-31T01:43:56+5:30
कुटुंबीयांस जीवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने मोबाइलवर फोटो काढून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना द्वारका भागातील महालक्ष्मी चाळीत घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण प्रतिबंधक (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : कुटुंबीयांस जीवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने मोबाइलवर फोटो काढून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना द्वारका भागातील महालक्ष्मी चाळीत घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण प्रतिबंधक (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष राजेंद्र चावरिया (२१) व भावेश कैलास पवार (२०) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे. महालक्ष्मी चाळ भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस भावेश पवार या युवकाने आपल्या घरी बोलावून हे कृत्य केले. कुटुंबीयांस ठार मारण्याची धमकी देत आशिष चावरिया याच्यासमवेत मुलीस फोटो काढण्यास भाग पाडले. त्यानंतर मुलगी परिसरातील मैदानावरील सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेली असता चावरिया याने तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.