अल्पवयीन मुलीचा विनयभंग; सक्तमजुरीची शिक्षा

By Admin | Published: October 26, 2016 11:45 PM2016-10-26T23:45:14+5:302016-10-26T23:45:43+5:30

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; सक्तमजुरीची शिक्षा

Molestation of minor girl; Hard labor education | अल्पवयीन मुलीचा विनयभंग; सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; सक्तमजुरीची शिक्षा

googlenewsNext

नाशिक : आई व भावासह रिक्षाने प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी आबिद अली सज्जाद गोवावाला (४०, रा़ स्रेहा पार्क, शिखरेवाडी, नाशिकरोड) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके -जोशी यांनी मंगळवारी (दि़२५) एक वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़
१४ एप्रिल २०१४ रोजी अल्पवयीन मुलगी आपली आई व भावासह रिक्षाने नाशिकरोड ते आंबेडकरनगर असा प्रवास करीत होती़ या रिक्षामध्ये आरोपी आबिद गोवावाला हा पत्नीसह बसलेला होता़ या प्रवासादरम्यान आरोपीने मुलीचा विनयभंग केला. पहिल्या वेळेस मुलीने दुर्लक्ष केले मात्र त्याने पुन्हा दुसऱ्यांदा विनयभंग केल्याने मुलगी ओरडली व तिने रिक्षा थांबवत गोवावाला यास बेदम चोप देत उपनगर पोलिसांच्या हवाली केले होते़  या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आरोपी गोवावाला विरोधात विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता़ या खटल्यात सरकारी वकील दीपशिखा भिडे- भांड यांनी चार साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलीची आई, भाऊ, रिक्षावाला व तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक साईप्रकाश चन्ना यांची साक्ष महत्त्वाची ठरली़ या गुन्ह्यात न्यायालयाने गोवावाला यास भादंवि कलम ३५४ (विनयभंग) अन्वये शिक्षा सुनावली़

Web Title: Molestation of minor girl; Hard labor education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.