घरात जाऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 05:47 PM2019-05-06T17:47:01+5:302019-05-06T17:47:34+5:30

गंगावाडी रविवार कारंजा परिसरात ते राहण्यास आल्यानंतर घरात मुलगी एकटी असल्याचा फायदा घेऊन संशयित सुनील याने घरात जाऊन तीला बळजबरीने शरीरसुखासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असताना मुलीने आरडाओरड केली.

Molestation of a minor girl in the house | घरात जाऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

घरात जाऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Next
ठळक मुद्देपोलिसांनी संशयित सुनील यास अटक केली

नाशिक : मैत्रीसाठी दबाव वाढवून १७ वर्षाच्या मुलीचा पाठलाग करत शरीरसुखासाठी तिच्या राहत्या घरात प्रवेश करून विनयभंग केल्याची घटना रविवार कारंजा परिसरात घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अवधुत सुनील जाधव (१९,रा. शिवशक्तीनगर, सिडको) यास सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरूध्द विनयभंग व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित सुनील हा सातत्याने पिडित अल्पवयीन मुलगी व तिच्या आईला त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून ते वारंवार घर बदलत होते. सुनील हा पिडित मुलीला बळजबरीने मैत्री करण्यास दबाव वाढवून धमकावत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गंगावाडी रविवार कारंजा परिसरात ते राहण्यास आल्यानंतर घरात मुलगी एकटी असल्याचा फायदा घेऊन संशयित सुनील याने घरात जाऊन तीला बळजबरीने शरीरसुखासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असताना मुलीने आरडाओरड केली. यावेळी मुलीचा आवाज ऐकून आई धावत घरात आली असता सुनील याने त्यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की के ली. स्त्रीमनाला लज्जा उत्पन्न होईल, अशा शब्दांत त्याने शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित सुनील यास अटक केली असून त्याच्यावर विनयभंग व बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक पिंपरे करीत आहेत.

 

Web Title: Molestation of a minor girl in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.