फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:27 PM2019-02-08T23:27:06+5:302019-02-09T00:33:28+5:30
अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग तसेच तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग करणाऱ्या दोघांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिक : अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग तसेच तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग करणाऱ्या दोघांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आदित्य भाऊराव रोकडे व साहील सुरेश मोरे (दोघेही रा़वासाळी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत़
पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या आईसोबत फोनवर बोलण्यासाठी बाहेर आली असता संशयित आदित्य रोकडे याने इशारा करून तिला अंधारात बोलावून घेतले़ तसेच तुझा फोटो व्हायरल करेल अशी धमकी देऊन तिचा विनयभंग केला़ यासाठी संशयित साहिल मोरे याने मदत केली़ यापूर्वीदेखील रोकडे याने या मुलीचा पाठलाग करून विनयभंग करीत घरच्यांना मारण्याची धमकी दिली होती़ या दोघा संशयितांवर पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.