महाविद्यालयातील दोघा प्राध्यापकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 01:26 PM2018-09-19T13:26:35+5:302018-09-19T13:27:11+5:30
नाशिक : बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थिनीस पास करण्यासाठी महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांनी तिचा विनयभंग करून शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पंचवटीतील एका महाविद्यालयात घडला आहे. याप्रकरणी पिडीत विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून या प्राध्यापकांना अटक केली आहे़ दरम्यान, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थिनीने खोटी तक्रार केल्याचे पत्र पोलिसांना दिले आहे़
नाशिक : बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थिनीस पास करण्यासाठी महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांनी तिचा विनयभंग करून शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पंचवटीतील एका महाविद्यालयात घडला आहे. याप्रकरणी पिडीत विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनीविनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून या प्राध्यापकांना अटक केली आहे़ दरम्यान, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थिनीने खोटी तक्रार केल्याचे पत्र पोलिसांना दिले आहे़
आडगावचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी परिसरातील एका महाविद्यालयातून अकरावी पास झालेल्या विद्यार्थिनीने २०१६ मध्ये बारावीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. या महाविद्यालयातील प्राध्यापक संशयित प्रवीण दादाजी सूर्यवंशी (रा़ निर्माण नक्षत्र, औरंगाबाद रोड) व सचिन निशिकांत सोनवणे (धात्रक फाटा, बलरामनगर)यांनी मुलांना काय बनायचे आहे असे कागदावर लिहून मागीतले़ यावेळी विद्यार्थिनीने कागदावर लिहून दिले त्यावेळी या दोघांनी तिच्या हाताला स्पर्श केला़ तसेच पिडीत विद्यार्थिनी ही बारावीला वारंवार एका विषयात नापास होत होती़
संशयित प्राध्यापक सूर्यवंशी व सोनवणे यांनी संबंधित विद्यार्थिनीस नापास झालेल्या विषयात पास व्हायचे असल्यास तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी केली तसेच प्रॅक्टिकल दरम्यान विनयभंग केला़ १ जानेवारी २०१५ पासून ते १८ सप्टेंबर २०१८ असा सुमारे तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या त्रासास कंटाळलेल्या पिडीत विद्यार्थिनीने पालकांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी मंगळवारी (दि.१७) आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत प्राध्यापकांविरोधात फिर्याद दिली़