लॉकडाऊननंतर ३५ जोडप्यांच्या विवाहाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:39 AM2020-06-29T00:39:12+5:302020-06-29T00:40:26+5:30

कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे एकीकडे जुळलेले लग्न पुढे ढकलण्याची वेळ अनेकांवर आली, तर दुसरीकडे प्रेमविवाह करण्यासाठी अर्ज सादर केलेल्या जोडप्यांना विवाह नोंदणी कार्यालय उघडण्याची वाट पहावी लागली. १८ मेपासून कार्यालये सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील ३५ जोडपे विवाह बंधनात अडकले.

Moment of marriage of 35 couples after lockdown | लॉकडाऊननंतर ३५ जोडप्यांच्या विवाहाला मुहूर्त

लॉकडाऊननंतर ३५ जोडप्यांच्या विवाहाला मुहूर्त

Next
ठळक मुद्देनोंदणी पद्धत : तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अडकले बंधनात; प्रेमविवाह करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक

नाशिक : कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे एकीकडे जुळलेले लग्न पुढे ढकलण्याची वेळ अनेकांवर आली, तर दुसरीकडे प्रेमविवाह करण्यासाठी अर्ज सादर केलेल्या जोडप्यांना विवाह नोंदणी कार्यालय उघडण्याची वाट पहावी लागली. १८ मेपासून कार्यालये सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील ३५ जोडपे विवाह बंधनात अडकले.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेकांना लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलावे लागले, तर काहींनी आपसांतील दोन-चार माणसांमध्ये लग्नविधी उरकण्याची समजदारी दाखविली.
विवाह नोंदणीची संख्या वाढण्याची शक्यता
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वºहाडींची गर्दी टाळण्यासाठी अनेक कुटुंबेदेखील नोंदणी विवाह करण्याच्या तयारीत असल्याने विवाह नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लग्न सोहळ्याला आलेल्या मर्यादा आणि हुकणारे मुहुर्त यांचा विचार करता अनेक कुटुंबियांनी नोंदणी विवाह पद्धतीसाठी विचारणा केली आहे. त्यामुळे नोंदणी विवाह वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Moment of marriage of 35 couples after lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.