उमराणेत आता मालविक्र ीचे पैसे रोखीने मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:35 AM2018-06-01T00:35:37+5:302018-06-01T00:35:37+5:30
उमराणे : येथील बाजार समिती प्रशासन व व्यापारी असोसिएशनने दि. १ जूनपासून शेतमाल विक्रीचे पैसे रोखीने देण्याच्या आश्वासनानुसार शुक्रवारपासून शेतमाल विक्रीचे पैसे रोखीने मिळणार असल्याची माहिती सभापती राजेंद्र देवरे यांनी दिली आहे.

गेल्या दोन तीन महिन्यांपासून उमराणे बाजार समितीत मालविक्रीचे पैसे धनादेशद्वारे मिळत होते, परंतु या काळात व्यापाऱ्यांचे धनादेश बाउन्स होत असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला होता. शेतकºयांचे पैसे मिळावेत यासाठी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. यावर उपनिबंधकांनी बाजार समिती प्रशासनाला कडक निर्देश देत ज्या व्यापाºयांकडे शेतकºयांचे पैसे व बाजार समितीची देखभाल फी थकीत आहे अशा व्यापाºयांची लिलावात बोली बंद करण्यात येऊन निर्धारित वेळेत पैसे न दिल्यास कलम ५७ इ नुसार त्यांची मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश बाजार समितीला देण्यात आले आहेत. महिनाभरापूर्वी बाजार समिती प्रशासन, व्यापारी असोसिएशन व शेतकरी बांधवांची बैठक बोलविण्यात आली होती. शेतकरी बांधवांना त्यांच्या मालविक्रीचे पैसे रोखीने मिळावेत या शेतकºयांच्या मागणीनुसार बाजार समिती प्रशासनाने व्यापारी बांधवांना विश्वासात घेऊन मालविक्रीचे पैसे रोखीने होण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली.