टीडीआर चौकशी समितीला लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:14 AM2021-03-07T04:14:49+5:302021-03-07T04:14:49+5:30

शहरातील आरक्षित भूखंड ताब्यात घेताना त्यात अनेक प्रकारचे गैरप्रकार होत असल्याचे प्रकारदेखील उघडकीस आले आहेत. यासंदर्भात १ डिसेंबर २०२० ...

Moment of TDR inquiry committee | टीडीआर चौकशी समितीला लागेना मुहूर्त

टीडीआर चौकशी समितीला लागेना मुहूर्त

Next

शहरातील आरक्षित भूखंड ताब्यात घेताना त्यात अनेक प्रकारचे गैरप्रकार होत असल्याचे प्रकारदेखील उघडकीस आले आहेत. यासंदर्भात १ डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या महापालिकेच्या महासभेत जगदीश पाटील यांनी नाशिक शिवारातील सर्व्हे नंबर १५९ (भाग) येथे महापालिकेच्या १९९३ मध्ये मंजूर झालेल्या विकास आराखड्यात क्रीडांगणाकरिता आरक्षित क्षेत्र दाखविण्यात आले आहे. हे क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने जमीन मालकाच्या मागणीनुसार ७५ टक्के टीडीआर दिला. परंतु, मोबदला घेतल्यानंतर जागेचा ताबा देताना तेथे पत्र्याचे शेड कायम आहे. त्याचप्रमाणे जमीन नावावर करून देतानाच मालकी हक्क सदरात नेांदणी करून जमीन समतल करून देणे आवश्यक होते. परंतु, असे काहीच न करता ही जमीन ताब्यात घेण्यात आली. म्हणजेच, मनपाची फसवणूक करून जागामालकाने टीडीआर प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे. या प्रकरणाबाबत महासभेत चर्चा करण्यासाठी आल्यानंतर महापौरांनी चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अधिक्षक अभियंता संदीप नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. मात्र, या समितीची एकही बैठक घेण्यात आलेली नाही, अशी तक्रार पाटील यांनी केली आहे.

Web Title: Moment of TDR inquiry committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.