सोमवारी मद्यविक्रीची दुकाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:55 AM2018-06-24T00:55:35+5:302018-06-24T00:55:54+5:30
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार-संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने तीन दिवसांचा घोषित केलेला ‘ड्राय डे’ मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रद्द करण्यात आला असून, मतदानाच्या दिवशी सोमवारी (२५ जून) मतदानाच्या कालावधीत मद्य विक्रीची दुकाने बंद राहाणार आहे.
नाशिकरोड : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार-संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने तीन दिवसांचा घोषित केलेला ‘ड्राय डे’ मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रद्द करण्यात आला असून, मतदानाच्या दिवशी सोमवारी (२५ जून) मतदानाच्या कालावधीत मद्य विक्रीची दुकाने बंद राहाणार आहे. यामुळे वीकेण्डला तळीरामांची होणारी गैरसोय टळली आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने शनिवारी (२३ जून) सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचार सांगता होण्याबरोबर तीन दिवसांचा ‘ड्राय डे’ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घोषित करण्यात आला होता. त्यामुळे शनिवारी सायंकाळी ५ वाजेपासून सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत तीन दिवस मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. आभार नाशिक हॉटेल असोसिएशन मुंबईच्या असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात तीन दिवसांचा ‘ड्राय डे’ न ठेवता मतदानाच्या दिवशी सोमवारी मतदान काळापुरता मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवावी, अशी याचिका दाखल केली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी शनिवार, रविवारचा ड्राय डे रद्द करण्याबाबतचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला होता.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शनिवार, रविवारचा ‘ड्राय डे’ रद्द करण्यात आला असून, सोमवारी मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ पर्यंत मद्य विक्रीची दुकाने बंद राहणार आहे. तसेच मतमोजणीच्या दिवशी गुरुवार (२८ जून) मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ड्राय डे राहणार आहे. वीक एण्डला असलेला ड्राय डे रद्द झाल्यामुळे तळीरामांची गैरसोय टळली आहे.