राज्यातील साडेनऊ लाख आदिवासींच्या खात्यावर पैसे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:33+5:302021-06-16T04:20:33+5:30
चौकट- सर्वाधिक लाभार्थी नाशिक विभागात आदिवासी विभागाचे अमरावती, नागपूर, नाशिक आणि ठाणे असे चार विभाग असून नाशिक विभागात सर्वाधिक ...
चौकट-
सर्वाधिक लाभार्थी नाशिक विभागात
आदिवासी विभागाचे अमरावती, नागपूर, नाशिक आणि ठाणे असे चार विभाग असून नाशिक विभागात सर्वाधिक ४,०७,६५७ इतके तर सर्वात कमी लाभार्थी अमरावती विभागात (१,६४,५२४) आहेत. नागपूर विभागात १ लाख ६९ हजार ०४४ तर ठाणे विभागात २ लाख १० हजार ८४५ लाभार्थी आहेत. नाशिक विभागात धुळे, नंदुरबार, कळवण, नाशिक, राजूर, तळोदा, यावल या प्रकल्पांचा समावेश आहे. तळाेदा प्रकल्पात एकूण ८०,२५९ लाभार्थ्यांना खावटी योजनेचा लाभ मिळाला आहे. तर राजूर प्रकल्पात २६ हजार ४५८ लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत.
चौकट-
चार हजार प्रकरणे रद्द
खावटी योजनेसाठी कागदपत्र सादर केलेल्यांपैकी ४,९४९ प्रकरणे आदिवासी विकास विभागाने रद्द केली असून त्यात अमरावती विभागातील सर्वाधिक (१,९६९) प्रकरणांचा समावेश आहे. त्याखालोखाल नाशिक विभागाचा क्रमांक लागतो. ठाणे विभागातील ५९२ तर नागपूर विभागातील ६६८ प्रकरणांचा समावेश आहे.