वित्तमंत्र्यांचा धसका : तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना टंचाईग्रस्त गावांना टॅँकर देण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:26 AM2018-02-09T01:26:51+5:302018-02-09T01:27:28+5:30
नाशिक :ग्रामीण भागातील गावांना टॅँकर देण्यास नकार देणाºया जिल्हा प्रशासनाने राज्याच्या वित्तमंत्र्यांची धास्ती घेतली असून, टंचाईग्रस्त गावांचे टॅँकरचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नाशिक : पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई भासत असलेल्या ग्रामीण भागातील गावांना टॅँकर देण्यास नकार देणाºया जिल्हा प्रशासनाने नाशिक दौºयावर येत असलेल्या राज्याच्या वित्तमंत्र्यांची धास्ती घेतली असून, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणाºया बैठकीत प्रशासनावर रोष व्यक्त होण्याच्या शक्यतेने टंचाईग्रस्त गावांचे टॅँकरचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना संबंधित तहसीलदार, प्रांत अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. जिल्ह्यातील येवला व बागलाण या नेहमीच टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये डिसेंबर संपल्यानंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, संबंधित ग्रामपंचायतींनी टॅँकर मागणीचे ठराव करून पंचायत समित्यांना पाठविले तसेच गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी संयुक्त पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टॅँकर सुरू करण्याचे प्रस्ताव गेल्या महिन्यातच पाठविले आहेत. परंतु टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास नकार देऊन जिल्हा प्रशासनाने टॅँकर मागणीच्या प्रस्तावांमध्ये प्रत्येक वेळी त्रुटी काढून ते प्रस्ताव परत पाठविण्यात धन्यता मानली. दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला वणवण भटकण्याची वेळ आली. टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यास जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने गेल्या तीन वर्षांपासून राबविल्या जात असलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे बिंग फुटण्याच्या भीतीपोटी प्रशासन टॅँकर सुरू करण्यास नकार देत असल्याची टीकाही त्यातून केली गेली. ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे त्या गावांनी नजीकच्या दोन किलोमीटर परिसरात पाणी असलेल्या विहिरींचा शोध घेण्याचा सल्लाही प्रशासनाने देत टॅँकर नाकारले.