पैसा हे साधन, भक्ती ही साधना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:30 AM2018-09-14T01:30:21+5:302018-09-14T01:30:38+5:30
धर्म व समाजकार्यात पैसा सर्व काही नसतो ते साधन असू शकते; परंतु भक्ती ही खरी साधना असल्याचे मत पंचायती आनंद व शक्ती आखाड्याचे आनंद पीठाधीश्वर स्वामी बालकानंद गिरी महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
नाशिक : धर्म व समाजकार्यात पैसा सर्व काही नसतो ते साधन असू शकते; परंतु भक्ती ही खरी साधना असल्याचे मत पंचायती आनंद व शक्ती आखाड्याचे आनंद पीठाधीश्वर स्वामी बालकानंद गिरी महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
प्रयागराज अलाहाबाद येथे १० जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात ते त्र्यंबकेश्वर येथे आले असता त्यांनी ‘लोकमत’च्या अंबड येथील कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते. या कुंभमेळ्यात साधूसंतांच्या उपस्थितीत ‘एक शाम अटलजी के नाम’ हा विशेष कार्यक्रम आयोजण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय सेवासुविधा वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गजरही त्यांनीप्रतिपादित करून यासंदर्भात आश्रमातर्फे चालविलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यांच्या समवेत खंडेलवाल समाजाचे पदाधिकारी सुरेश रावत, नीलकमल खंडेलवाल व शिष्यपरिवार उपस्थित होता.
गोमूत्राचे महत्त्व ओळखण्याची गरज
गोसेवा हीदेखील ईश्वर सेवा असल्याचे सांगताना त्यांनी गोमूत्र व गायीच्या शेणाचे वैद्यकीय महत्त्व यावेळी समजावून सांगितले. भारतापेक्षा परदेशात गोमूत्राच्या वैद्यकीय वापराबाबत अधिक जागृती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारतात अद्याप म्हणावे तसे गोमूत्राचे महत्त्व ओळखले गेलेले नाही, असेही स्वामी बालकानंद गिरीजी यांनी सांगितले.