मनी एक ध्यास, मनी एक आस, तुझ्या दर्शनाची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 11:52 PM2019-07-05T23:52:33+5:302019-07-06T00:19:00+5:30

रीमध्ये यंदा नाशिक जिल्ह्यातील सर्व वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. कारण संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. शेकडो वर्षांपासून वारकऱ्यांचे डोळे या कार्यासाठी आसुसलेले आहेत. त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ मंदिराचे स्वप्न आता साकार होत असल्याने सर्व वारीतील वारकºयांमध्ये यासंबंधी चर्चा होताना दिसते.

 Money is an obsession, money aus, your eyesight! | मनी एक ध्यास, मनी एक आस, तुझ्या दर्शनाची!

मनी एक ध्यास, मनी एक आस, तुझ्या दर्शनाची!

Next

पंडित महाराज कोल्हे
वारीमध्ये यंदा नाशिक जिल्ह्यातील सर्व वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. कारण संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. शेकडो वर्षांपासून वारकऱ्यांचे डोळे या कार्यासाठी आसुसलेले आहेत. त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ मंदिराचे स्वप्न आता साकार होत असल्याने सर्व वारीतील वारकºयांमध्ये यासंबंधी चर्चा होताना दिसते.
मला स्वत:लादेखील या गोष्टीचा अपार आनंद होत आहे. एकप्रकारचे आत्मिक समाधान लाभत आहे. सर्व वारकरी घरापासून दूर असले तरी त्यांच्या डोळ्यासमोर जणू संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचे मंदिर आहे. वारीत चालताना वारकरी हे तहान-भूक विसरून चालत राहतात. कमी सुविधेमध्येही जीवन कसे जगावे हे वारी आपणाला शिकविते.
स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा भेदभाव वारीमध्ये सहजपणे विसरला जातो. एकप्रकारे सर्वांमध्ये समन्वयाची भूमिका निर्माण होते. दाहीदिशा फक्त भजनाचा नाद कानावर पडत असतो. त्या आनंदामध्ये माणूस स्वत:चे अस्तित्व हरवून जातो. यावर्षी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संस्थान ट्रस्टच्या वतीने प्रत्येक मुक्कामी पाच वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार दरमुक्कामी वारकरी हे कार्य पार पाडीत आहेत. आकाशातून अलगद पडणारा पाऊस आणि मुखामध्ये हरिनाम याचा आनंद काही वेगळाच असतो. वारीमध्ये हा आनंद सर्व वारकºयांना हा अत्यानंद देऊन जातो. परंतु वारकºयांना पंढरपूरपर्यंत काही बाधा पोहोचू नये, यासाठी यंदा शासनाच्या वतीने निर्मल वारीच्या माध्यमातून रेनकोट वाटप करण्यात आले आहेत. परंतु वारकरी हा ऊन, वारा, पाऊस याची पर्वा करीत नाही. वारीमध्ये कोणतीही सोयीसुविधा नसताना वारकºयांच्या मनाची अशी काही अवस्था होऊन जाते की, आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोहमयी संसारातून घरापासून दूर वाटचाल करीत असतो़ मिळेल ते अन्नपाणी सेवन करून वारकरी दरकोस, दरमुक्कामी अखंडपणे हरिनामाचा जप करत असतो़ वारीमध्ये आसरा मिळेल तेथे थांबायचे आणि गावकरी किंवा वारीतील संयोजक देतील ते खायचे, असे त्याचे दैनंदिन कार्य असते. फक्त पुढे पुढे जायचे हाच एक ध्यास आणि उद्देश त्याच्या मनामध्ये असतो. ‘मनी एक ध्यास, मनी एक आस तुझ्या दर्शनाची, तुझ्या चरणाची धूळ लागो माझ्या माथी’ अशी वारकºयांच्या मनाची भावना झालेली असते.
वारीत आपल्याला आचाराचा आणि विचारांचा समन्वय दिसून येतो़ अवघे धरू सुपंथ असा विचार घेऊन प्रत्येक वारकरी वारीत सहभागी झालेला असतो़ कुणाच्या हातात भगवा झेंडा तर कुणाच्या हातात टाळ-वीणा असते़ तर महिला वारकºयांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, तांब्याचा कलश असते़ सर्वजण वाटचाल करताना ऊन, वारा, पाऊस याची पर्वा करत नाहीत़ कुणाला काही अडचणी असेल तर लगेच धावून जातो आपल्या घासातील घास दुसºयाला देतो़ तसेच एकमेकाला पाणी देणे, कुणी आजारी असेल तर त्याची सेवा करणे अशी कामे करणे़ वारीमध्ये वारकरी करीत असतात़ त्याचप्रमाणे एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घेतात़ एकमेकांच्या समस्या जाणून सर्वांना धीर देतात़ महाराष्ट्रातील कानाकोपºयातून अनेक संतांच्या पालख्या निघतात़ त्याचबरोबर वारकºयांच्या असतात़ प्रत्येक वारकरी रोज सुमारे २० किमी पायी चालतो़ मुखी हरिनामाचा जप असल्याचा त्यांना हे अंतर पार करणे शक्य होते़ त्यात त्यांना कोणत्याही प्रकारचे श्रम वाटत नाही़ कारण त्यांचे मन आणि शरीर भक्तिमय होऊन गेलेले असते़ त्यांना फक्त विठ्ठल दर्शनाची आस लागलेली असते़ वारीमध्ये सहभागी होणारे आणि वारीत प्रत्यक्ष सहभागी न होता अन्नदान व अन्य प्रकारची मदत करणारे हे दोन्हीही वारकरीच होत. एकंदरीत वारीचा उद्देश काय तर भगवंताची सेवा अर्थात गोरगरिबांची सेवा होय. वारी म्हणजे एकप्रकारचा आनंदाचा महासागर होय़ याठिकाणी प्रत्येकजण आपले संसारिक दु:ख बाजूला ठेवून विठू माऊलीच्या भजनात तल्लीन झालेला असतो़ भजन कीर्तनात वारकरी रात्रंदिवस दंग झालेले असतो़ असा हा वारीचा आनंद सुख सोहळा असतो़
(लेखक संत निवृत्तिनाथ  समाधी संस्थानचे अध्यक्ष आहेत.)

Web Title:  Money is an obsession, money aus, your eyesight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.