कांद्याच्या पैशांची पंतप्रधानांना मनीआॅर्डर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:13 AM2018-11-30T01:13:33+5:302018-11-30T01:15:26+5:30
निफाड : उन्हाळ कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्याचे आर्थिक गणितच बिघडले आहे. घसरणाºया दरामुळे जिल्हाभरात ठिकठिकाणी शेतकरी बांधव रास्ता रोकोसारखी आंदोलने करीत असताना नैताळे येथील एका शेतकºयाने गुरुवारी (दि. २९) निफाड उपबाजार आवारात झालेल्या लिलावातून मिळालेल्या पैशांची मनीआॅर्डर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवत शेतकºयांचा सार्वत्रिक उद्विग्नभाव प्रदर्शित केला.

उन्हाळा कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी हतबल झाला आहे. उन्हाळ कांद्याचे दर एक रु पया किलोपर्यंत घसरले असल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नाही. परिणामी, शेतकरी रस्त्यावर उतरत कांदा ओतून देऊन संतापाला वाट मोकळी करून देत आहे. मात्र, नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी आपल्या अनोख्या निषेधाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निफाड येथील उपबाजार आवारात गुरु वारी आणलेल्या कांद्याला अवघा १५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने संजय साठे यांनी कांदा लिलावाचे आलेले हे पैसे चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनीआॅर्डर करून पाठवून दिले. संजय साठे यांनी आपला कांद्याचा ट्रॅक्टर निफाड बाजार समितीमध्ये विक्र ीसाठी आणला होता. यावेळी त्यांनी कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरवर बॅनर लावून त्यात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. बॅनरवर लिहिले होते, ‘शेतकरी-व्यापारी बंधूंनो आज कांदा उत्पादक शेतकºयांची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असून, त्याकडे कुणीही गांभीर्याने पाहत नाही. या शेतकºयांच्या व्यथा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळाव्यात या उद्देशाने मी आणलेल्या सर्व कांद्याचे पैसे आॅनलाइन मनिआॅर्डरद्वारे पंतप्रधानांना पाठविणार असून, मी जे काही करीत आहे हे कुठल्याही राजकीय हेतूने करीत नाही. तर केवळ शेतकºयांच्या व्यथा पंतप्रधानांना कळाव्यात हाच उद्देश आहे.’ निफाड उपबाजार येथे कांदा लिलाव होईपर्यंत बॅनर लावलेल्या साठे यांच्या ट्रॅक्टरकडे व्यापारी व शेतकरी कुतूहलाने पाहत होते.
१११८ रुपयांची मनीआॅर्डरलिलावात साठे यांच्या कांद्याला १५१ रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यांना कांद्याचे एकूण १०६४ रु पये मिळाले. त्यानंतर साठे यांनी थेट टपाल कार्यालय गाठले. कांदा लिलावातून आलेले १०६४ रु पये आणि त्यात स्वत:च्या खिशातून ५४ रु पये घालून एकूण १११८ रु पये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने नवी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाला पाठवून दिले. अकरावा महिना आणि सन २०१८ साल यामुळे त्यांनी १११८ रुपयाची रक्कम पंतप्रधानांना पाठविल्याचे सांगितले.