वक्तृत्व स्पर्धेत मोनिका जाधव प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:57 PM2020-01-09T23:57:20+5:302020-01-09T23:57:59+5:30
निफाड येथील सरस्वती विद्यालयात निफाड तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत मोनिका जाधव हिने बाजी मारली.
सायखेडा : निफाड येथील सरस्वती विद्यालयात निफाड तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत मोनिका जाधव हिने बाजी मारली.
अध्यक्षस्थानी निफाड पंचायत समितीच्या सभापती अनुसया जगताप होत्या, तर प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, पंचायत समिती सदस्य पंडित आहेर, शिवाजीराजे ढेपले, निफाड इंग्लिश स्कूलचे चेअरमन नंदलालजी चोरडिया, सरस्वती विद्यालयचे चेअरमन प्रवीण कराड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार यांनी केले. स्पर्धेमध्ये निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी वक्तृत्व, चित्रकला, वैयक्तिक नृत्य, समूहनृत्य, गीतगायन, धावणे, कबड्डी, खोखो या स्पर्धा घेण्यात आल्या. दिवसभर सर्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्यानंतर दुपारी ४ वाजता निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवाभाऊ सुरासे यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी संदीप कराड, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, सोमनाथ पानगव्हाणे, नगरसेविका सुनीता कुंदे, केशव तुंगार, विनायक टाकळकर, ज्योती भागवत यांच्या उपस्थितीत विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी एस. डी. थोरात, के. एम. बोरसे, व्ही. एन. गायकवाड, केंद्रप्रमुख विश्वास सानप, नूतन पवार, ओंकार वाघ, मुख्याध्यापक, पदाधिकारी प्रयत्नशील होते.
विजयी घोषित करण्यात आलेले विद्यार्थी...
लहान गट : वक्तृत्व : मोनिका जाधव प्रथम, मानसी पवार द्वितीय, गायत्री डोईफोडे तृतीय
चित्रकला : तन्मय साबळे प्रथम, ओंकार बागुल द्वितीय, आदित्य पाटील तृतीय
धावणे मुली : चंचल आहेर प्रथम, माया बर्डे द्वितीय, प्रवीणा चाबुकस्वार तृतीय
धावणे मुले : अथर्व काकड प्रथम, रोहित कंक द्वितीय, ऋषिकेश शिंदे तृतीय
वैयक्तिक गायन : सार्थक आहेर प्रथम, सागर माळी द्वितीय, सर्वज्ञ चोभे तृतीय
वैयक्तिक नृत्य :
रेणुका शिंदे प्रथम, सान्वी दुधाणे द्वितीय, श्रद्धा थाटे तृतीय.
समूहगायन : रेल्वे स्थानक शिवडी प्रथम, कोकणगाव द्वितीय.
समूहनृत्य : देवगाव प्रथम, पिंपळस द्वितीय.
मोठा गट वक्तृत्व
प्राची आरोटे प्रथम,
पूजा कमानकर द्वितीय,
चंचल ठोंबरे तृतीय.
चित्रकला
धनश्री चौधरी प्रथम,
ऋतुजा गाडे द्वितीय,
पीयूषकुमार यादव तृतीय.
धावणे मुले
आकाश माळी प्रथम,
चेतन बर्डे द्वितीय,
जगन पिंपळे तृतीय
धावणे मुली
प्रणाली सानप प्रथम,
रेणुका गुंबाडे द्वितीय,
निकिता माळी तृतीय.
वैयक्तिक गायन
समृद्धी रु कारी प्रथम,
निकिता जाधव द्वितीय,
पायल पेडेकर तृतीय.
समूहगायन
कोकणगाव प्रथम,
सोनेवाडी बुद्रुक द्वितीय,
वैयक्तिक नृत्य
साक्षी कडवे प्रथम,
निकिता जाधव द्वितीय,
श्रद्धा निकम तृतीय.
समूहनृत्य
काथरगाव प्रथम,
ओझरटाउनशिप द्वितीय,
खोखो मुले
धारणगाववीर प्रथम,
पिंपळगाव निपाणी द्वितीय.
खोखो मुली
धारणगाववीर प्रथम,
मुखेड द्वितीय.
कबड्डी मुले
बोकडदरे प्रथम,
सोनेवाडी बुद्रक द्वितीय
कबड्डी मुली
कोकणगाव प्रथम,
बोकडदरे द्वितीय.