हेटाळणीमुळे मोनिका आथरेला अश्रू अनावर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:52 AM2017-09-04T00:52:57+5:302017-09-04T00:53:11+5:30
गेल्या महिन्यात लंडन येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक स्पर्धेत नाशिकची धावपटू मोनिका आथरे हिला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता न आल्याने नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी वगळता कोणीही स्वागताला आले नाही, तसेच आॅफिसमध्येदेखील मला सहकर्मचाºयांकडून जाणीवपूर्वक हेटाळले गेले, अशी खंत धावपटू मोनिका आथरे हिने रविवारी एका हॉटेलमध्ये नाशिक जिल्हा अॅथलेटिक असोसिएशनतर्फे रविवारी (दि. ३) आयोजित कार्यक्रमात केली.
नाशिक : गेल्या महिन्यात लंडन येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक स्पर्धेत नाशिकची धावपटू मोनिका आथरे हिला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता न आल्याने नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी वगळता कोणीही स्वागताला आले नाही, तसेच आॅफिसमध्येदेखील मला सहकर्मचाºयांकडून जाणीवपूर्वक हेटाळले गेले, अशी खंत धावपटू मोनिका आथरे हिने रविवारी एका हॉटेलमध्ये नाशिक जिल्हा अॅथलेटिक असोसिएशनतर्फे रविवारी (दि. ३) आयोजित कार्यक्रमात केली.
नाशिकचे क्रीडाप्रेमी तसेच विविध सामाजिक संघटना यांनी खेळाडूंची किंमत करायला शिकावे, ४२ किमी अंतर पूर्ण करणे काय असते याबाबत फक्त धावपटू तसेच क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनाच माहिती असल्याने इतरांनी ही प्रक्रिया समजून घेत खेळाडूंना अशी वागणूक देणे चुकीचे आहे, असे म्हणत मोनिका मनोगत व्यक्त करताना गहिवरून आले आणि कार्यक्रमातील वातावरण एकदम स्तब्ध झाले. यावेळी मोनिकाने आपलेच लोक पदक मिळाले म्हणून आपली हेटाळणी करत असतील तर अशा नागरिकांना काय म्हणावे, स्पर्धेहून परतल्यानंतर लगेचच जबाबदारी ओळखून कार्यालयीन कामकाजाला सुरुवात केली तरी मला स्पर्धेचा अनुभव कसा होता ? किंवा यश नाही मिळाले तरी काही हरकत नाही पुढे होणाºया स्पर्धेसाठी तरी शुभेच्छा देणे अपेक्षित होते, असे म्हणत आपल्या कार्यालयीन सहकाºयांवरदेखील मोनिकाने थेट नाराजी व्यक्त केली आणि कार्यालयातील सहकाºर्यांनी कसे टोमणे मारले आणि हेटाळले याचा अनुभव यावेळी मांडला. मोनिका आथरे हिने लंडन येथे झालेल्या स्पर्धेत २ तास ४९ मिनिटे आणि ५४ सेकंद अशी वेळ निर्धारित ४२ किमीचे अंतर पूर्ण करून विविध देशांतून सहभागी झालेल्या २६८ धावपटूंमधून ६४ वा क्रमांक मिळवला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मोनिकाने केलेली खंत रास्त असून प्रत्येक खेळाडूचा तो हक्क आहे. स्पर्धेत यश आणि अपयश मिळाले तरीही खेळाडूंना सारखाच पाठिंबा मिळायला हवा, असे सांगताना यापुढे असे होणार नाही याबाबत खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन दिले. तर प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी अशी हेटाळणी करणाºया लोकांच्या बौध्दिक आणि शैक्षणिक पातळीचा विकास झालेला नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले तसेच स्पर्धेनिमित्त आपण देशाबाहेर असल्याने तुझे स्वागत करता आले नाही, असेही सिंग यांनी यावेळी सांगितले.
स्पर्धेत अपयश मिळाल्यानंतर कोणीही आपली विचारपूस करत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करताना मोनिकाने उपस्थित खेळाडूंना जीवनात प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागतो, स्पर्धेसाठी तयारी करताना मार्गात येणाºया प्रत्येक अडथळ्यावर मात करून पुढे जायला हवे, असे आवाहन केले. तसेच आगामी मे महिन्यात आॅस्ट्रेलिया येथे होणाºया कॉमनवेल्थ स्पर्धांसाठी तयारी सुरू असल्याचे मोनिका हिने यावेळी सांगितले.