शेतीच्या नुकसानीची पाहणी, पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 03:26 PM2019-11-01T15:26:52+5:302019-11-01T15:30:39+5:30

VfZ°fe¨¹ff ³fbIYÀff³fe¨fe ´ffW¯fe, ´fÔ¨f³ff¸fZ

  Monitoring of agricultural losses, Panchanam | शेतीच्या नुकसानीची पाहणी, पंचनामे

पाचोरे वणी येथील द्राक्ष बागांचे झालेले नुसकान व पंचनामे करतांना आहेरगाव येथील तलाठी  कर्मचारी नितीन जहागीरदार आहेरगावचे ग्रामविकास अधिकारी भालचंद्र तरवारे,पचोरे वणी ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण अहिरराव व शेतकरी वर्ग

Next

 

¦f

 



शेतीच्या नुकसानीची पाहणी, पंचनामे

शेतीच्या नुकसानीची पाहणी, पंचनामे
पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे  द्राक्ष डाळिंब भाजीपाला व शेतात पाणी साचल्याने खरीप हंगामातील टॉमेटो,मका, ऊस,बाजरी,सोयाबीन,कांदा व भुईमूग आदी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकासोबत काढून ठेवलेल्या पिक देखील पाण्याखाली गेल्याने वाया गेले आहे दिवाळीत या बेमोसमी पावसाने कहर केल्याने तयार पीक काढता येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सातच्या पावसामुळे शेतातील मका ,बाजरी व जनावरांसाठी साठून ठेवलेला चारदेखील सडून गेल्याने  चाº्याचा येणाº्या काळात गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.मका सोयाबीन या पिकांना कोंब फुटेल आहेत द्राक्ष टोमॅटो मका,ऊस ,बाजरी ,सोयाबीन,कांदा या पिकांचेही मोठे नुकसान झाले  आहे.
अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना जास्तीत जास्त आर्थिक मद्दत द्यावी अशी मागणी निफाड तालुक्याचे   आमदार दिलीप बनकर यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली होती.  कोळवाडी श्रीरामनगर, दीक्षि,बेंदमळा,आहेरगाव,उंबरखेड,नारायण टेभी ,कारसुळ,दावचवाडी,लोणवाडी,पाचोरे वणी आदी परिसरात पंचनामे सुरू झाले आहे.यावेळी आहेरगाव व पाचोरे वणी येथील द्राक्ष बागांचे झालेले नुसकान व पंचनामे करतांना आहेरगाव येथील तलाठी  कर्मचारी नितीन जहागीरदार आहेरगावचे ग्रामविकास अधिकारी भालचंद्र तरवारे,पचोरे वणी ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण अहिरराव व शेतकरी वर्ग उपस्थित होते.

 

Web Title:   Monitoring of agricultural losses, Panchanam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.