विकासकामांच्या अंमलबजावणीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 10:07 PM2020-01-19T22:07:43+5:302020-01-20T00:19:18+5:30

सटाणा येथील नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी राज्यातील आदर्श गाव म्हणून ख्याती असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथे भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी पाटोदा गावातील विविध विकासकामे, उपाययोजना व अंमलबजावणीची पाहणी करून सरपंच भास्कर पेरे-पाटील यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.

Monitoring the implementation of development works | विकासकामांच्या अंमलबजावणीची पाहणी

आदर्श गाव पाटोदा येथे विविध विकासकामे व उपाययोजनांची पाहणी करताना नगराध्यक्ष सुनील मोरे. समवेत वैभव गांगुर्डे, दत्तू बैताडे, नाना मोरकर आदी.

Next
ठळक मुद्देसटाणा : नगराध्यक्ष मोरे यांची आदर्श गाव पाटोद्याला भेट

सटाणा : येथील नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी राज्यातील आदर्श गाव म्हणून ख्याती असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथे भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी पाटोदा गावातील विविध विकासकामे, उपाययोजना व अंमलबजावणीची पाहणी करून सरपंच भास्कर पेरे-पाटील यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.
आदर्श गावासाठीचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कारप्राप्त पाटोदा गावस राज्य शासनाचीही विविध पुरस्कारप्राप्त आहेत. शंभर टक्के हागणदारीमुक्त असलेल्या गावाची शंभर टक्के कर वसुली होते. प्रत्येक घरात तीन नळकनेक्शन असून, एकाद्वारे प्रत्येकास दरडोई वीस लिटर शुद्ध अक्वॉगार्डचे पाणी मोफत पुरविले जाते. उर्वरित नळांपैकी एका नळाने सौरऊर्जेवर तापलेले अंघोळीचे गरम पाणी तर दुसऱ्या नळातून वापरण्यासाठीचे पाणी घरोघरी पुरविले जाते. सर्व ग्रामस्थांना ग्रामपंचायतीमार्फत मोफत धान्य दळून मिळते तसेच पापड, शेवया, कुरडया आदी वस्तूही मोफत करून मिळतात. गाव, परिसरात पर्यावरण रक्षणासाठी मोलाचे काम होत असून, घरोघरी वृक्ष लागवड व संवर्धनाचे कार्य केले जाते तसेच स्वच्छतेसाठीही उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. शहर विकासाची कामे तसेच शहरवासीयांच्या सोयी-सुविधांसह उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी ही भेट मोलाची ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्याच्या अलीकडच्या प्रत्येक ग्रामविकास मंत्र्यांनी पाटोद्याला भेट दिलेली आहे. देश-परदेशातील व राज्यभरातील ग्रामस्थ पाटोद्याला भेट देऊन पाहणी करतात. याच पद्धतीने नगराध्यक्ष मोरे यांनी भेट देऊन संपूर्ण गावभरातील विकासकामे, उपाययो जनांच्या अंमलबजावणीची पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन जाणून घेतले.

Web Title: Monitoring the implementation of development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.