आक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी संनियंत्रण अधिकारी नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:16 AM2021-04-01T04:16:18+5:302021-04-01T04:16:18+5:30
कोरोनाच्या वाढत्या रग्णसंख्येमुळे सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांना दररोज लागणाऱ्या ऑक्सिजनची माहिती रुग्णालयानुसार संकलीत ...
कोरोनाच्या वाढत्या रग्णसंख्येमुळे सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांना दररोज लागणाऱ्या ऑक्सिजनची माहिती रुग्णालयानुसार संकलीत करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा कार्यक्षेत्रात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी सर्व बाबींचे समन्वय करण्याचे काम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर श्रीवास हे संपूर्ण जिल्ह्याकरिता संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील.
अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी श्रीवास ऑक्सिजनची माहिती संकलनाबरोबरच खासगी रुग्णालयांना भेटी देऊन सर्व रुग्णालयांना तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनेनुसारच ऑक्सिजनचा वापर होतो किंवा नाही, याची खात्री करणार आहेत. आक्सिजन वाया जाणार नाही, याबाबत दक्षता, जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णास ऑक्सिजन पुरवठा खंडित होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले आहेत.