एकाधिकार धान्य खरेदी केंद्र अचानक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 02:44 PM2020-01-24T14:44:44+5:302020-01-24T14:45:19+5:30
पेठ -आदिवासी विकास महामंडळाकडून आदिवासी भागात सुरू करण्यात आलेले एकाधिकार धान्य खरेदी केंद्र शुक्र वारी अचानक बंद करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे चांगलेच हाल होत आहे.
पेठ -आदिवासी विकास महामंडळाकडून आदिवासी भागात सुरू करण्यात आलेले एकाधिकार धान्य खरेदी केंद्र शुक्र वारी अचानक बंद करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे चांगलेच हाल होत आहे. याबाबत भाजपाच्या पेठ शाखेच्या वतीने निवेदन देऊन सदरचे धान्य खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.
आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशीक शाखा व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेठ तालुक्यातील करंजाळी, कोहोर, जोगमोडी, आंबे, पाटे येथील एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर हमाल वर्गाने हमाली कमी केल्याच्या कारणावरून बिहष्कार टाकला आहे. पुर्वी १७ रु . दिली जाणारी हमाली ११ रू.करण्यात आल्याने कामबंद केल्याने खरेदी व्यवस्था ठप्प झाली आहे. शुक्र वारी करंजाळी येथे आठवडे बाजार असल्याने परिसरातील शेतकरी मोठया प्रमाणावर धान्य घेऊन आले. मात्र खरेदी केंद्रच बंद असल्याने शेतकर्यांना खुल्या बाजारात कवडीमोल भावात विक्र ी करावे लागले. भारतीय जनता पार्टीच्या पेठ शाखेच्या वतीने गोडाऊन व्यवस्थापक पंकज महाले यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.आदिवासी शेतकरयांची गैरसोय लक्षात घेऊन त्वरीत तोडगा काढून धान्य खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय वाघ, हनुमंत भूसारे, श्याम भूसारे, यशवंत खंबाईत, भास्कर गवळी, राधेशाम भुसारे, बंडू गावंढे, भास्कर राऊत, सुरेश भोये, राजू गवळी, लहुराज गवळी, तुकाराम चौधरी, कुमार गवळी, संजय पोटींदे, रघूनाथ चौधरी यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते.