मान्सून आला... आपत्ती टाळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:39 AM2019-07-01T00:39:29+5:302019-07-01T00:40:23+5:30
दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वाºयामुळे शेकडो घरांचे पत्रे उडाले, तर वीज कोसळून नागरिकांना जीव गमवावा लागला.
नाशिक : दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वाºयामुळे शेकडो घरांचे पत्रे उडाले, तर वीज कोसळून नागरिकांना जीव गमवावा लागला. ठिकठिकाणी झाडे व फांद्या उन्मळून पडल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्यास बराच कालावधी लोटला. दरवर्षी पावसाळ्यात नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा धोका निर्माण होतो. ही आपत्ती नेमकी कधी व कशी येईल हे कोणी सांगू शकत नाही, तसेच ती थोपवणेही कोणाला शक्य नाही. मात्र अशी आपत्ती आली किंवा येणार असेल तर फार फार तर जीवित व वित्तहानी कशी टाळता येईल, त्याबाबत उपाययोजना करणे मानवाला शक्य आहे. यंदा मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच मान्सूनपूर्व पावसाने सलामी देत भविष्याची चुणूक दाखविली आहे. पाऊस म्हटला की वादळी वारा, वीज कोसळणे, नदी, नाल्यांना महापूर येणे या नैसर्गिक आपत्तीच्या संभाव्य घटना घडू शकतात. त्यापासून बचाव करणे व आपत्तीत सापडलेल्यांना मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत काही खबरदारीच्या उपाययोजना सुचविण्यात येऊन विविध यंत्रणांची जबाबदारीही निश्चित करण्यात आलेली आहे. अर्थात शासकीय यंत्रणा सारे काही घडून गेल्यावर उपाययोजना करेनच, परंतु नैसर्गिक आपत्तीपासून स्वत:चा बचाव कसा करता येईल, नागरिकांनी सतर्क राहणेही गरजेचे आहे. धोकादायक ठिकाणांवर सेल्फी घेणे, गड, किल्ले, ट्रेकिंग ठिकाणांची माहिती नसताना गर्दी करणे, पूर-धबधब्याचे फोटो काढणे आदी गोष्टी टाळणे क्रमप्राप्त आहे. स्वत: सुरक्षित राहिल्यास दुसºयाची सुरक्षितता जोपासता येते हेच सर्वाधिक महत्त्वाचे...
अशी आहे
मान्सूनपूर्व तयारी
४जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला असून, कार्यालयीन वेळेमधील कर्मचाऱ्यांची ड्यूटी धरून जिल्हास्तरीय कार्यालयांचे कर्मचाºयांची रात्रीच्या दोन पाळ्यांमध्ये अशा एकूण तीन पाळ्यांमध्ये (दिवस व रात्र) नियंत्रण कक्ष सुरू आहे.
४जिल्हा नियंत्रण कक्षासाठी १०७७ हा टोल फ्री क्रमांक सर्वांसाठी कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
४तालुकास्तरावर १ जूनपासून २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्या सूचना देण्यात येऊन ते कार्यान्वित झाले आहेत.
४जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना तालुकास्तरावरील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी यांच्या आवश्यकतेनुसार मान्सूनपूर्व बैठक घेऊन तालुक्यामध्ये आवश्यक त्या आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
४पाटबंधारे विभागास नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचा साठा महसूल विभागास कळविणे तसेच सोडलेले पाणी व त्यामुळे बाधित होणारी गावे याबाबतची माहिती कळविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पूरबाधित गावांना अगोदर सूचना देणे काठावरच्या गावांमधील नागरिकांना धोका पोहोचू नये म्हणून आगाऊ कार्यवाही करणे सहज शक्य होणार आहे.
गोदावरीच्या पुराचा धोका
गोदावरी व दारणा नदी या दोन महत्त्वाच्या नद्या असून, या नद्यांवर धरणे बांधण्यात आलेली आहेत. गौतमी गोदावरी, कश्यपी, गंगापूर व आळंदी या चार धरणांतून साधारणत: वीस हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केल्यास गोदावरी नदीच्या पुराचा फटका नाशिक शहरातील नदीकाठच्या वस्त्यांना पोहोचू शकतो. तर मुकणे, दारणा, कडवा, वालदेवी या धरणांतून पाणी सोडल्यास ते दारणा नदीतून ३५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केल्यास दारणा, सांगवी, गोंडेगाव, कोठुरे, कालवी, सावळी, गंगावाडी या गावांना धोका पोहोचतो. वाघाड, करंजवण, पुनेगाव, ओझरखेड, पालखेड या धरणातून कादवा नदीतून ३५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाल्यास ब्राह्मणगाव, सुंदरपूर, रौळस या गावांना पुराचा धोका आहे.
४गोदावरी, दारणा व कादवा या तीन धरणांचा विसर्ग नांदूरमधमेश्वर येथे येतो, त्यामुळे बॅक वॉटरमुळे सायखेडा, चांदोरी या गावांना आजवर वेळोवेळी पाण्याचा विळखा पडत असला तरी, गेल्या तीन वर्षांपासून नांदूरमधमेश्वर धरणाला दरवाजे बसविण्यात आल्याने पुराचा धोका कमी झाला असला तरी, साधारणत: ९० हजार क्यूसेकच्या पुढे विसर्ग झाल्यास चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, मांजरगाव, चाटोरी, खेडलेझुंगे, वडगाव, कानळद, कोपरगाव या गावांना पुराच्या पाण्याचा धोका आहे.