वारीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह
By Admin | Published: January 23, 2017 12:03 AM2017-01-23T00:03:57+5:302017-01-23T00:04:12+5:30
दिंंड्या पोहोचल्या : त्र्यंबकेश्वर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम
त्र्यंबकेश्वर : श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त अंजनेरी जवळील ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज खेडगावकर यांच्या आश्रमासह विविध ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पाचोरे वणी येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर कार्यकारी मंडळातर्फे देण्यात आली. सोमवारी (दि.२३) दुपारी ४ ते ६ वाजेदरम्यान दामोदर महाराज खेडगावकर यांचे कीर्तन होणार आहे. मंगळवारपासून (दि. १७) सुरू असलेल्या या कीर्तन सोहळ्यात स्वामी ब्रह्ममूर्ती पब्लिक स्कूलच्या मु्ख्याध्यापक मनीषा ताजणे, उस्मानाबादचे भागवत महाराज पानसरे, आळंदीचे वाडेकर, नाशिकचे महारूद्र शास्त्री तिडके, दुगावचे रामकृष्ण महाराज धोंडगे आदिंच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. मंगळवारी (दि. २४) सकाळी ८ ते १० दरम्यान पुंडलिक महाराज खुरमुटे त्यांचे कीर्तन होणार आहे. यानंतर संत, महंत व भाविकांचा सत्कार होऊन महाप्रसाद व भोेजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चांदवड तालुक्यातील कन्हेरवाडी येथील ग्रामस्थांसह मुरलीधर मंदिरातील भजनी मंडळ, बळसाने (साक्री), खेडगाव (दिंडोरी) आदिंसह निफाड तालुक्यातील ग्रामस्थ हा कीर्तन सोहळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. रोज पहाटे विविध धार्मिक कार्यक्रम काकडारती, भजन, ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा, कीर्तन आदि कार्यक्रम होत आहेत. सप्ताहास उपस्थित राहण्याचे आवाहन भक्तमंडळातर्फे करण्यात आले आहे.
लोणजाई माता दिंडी सोहळा निफाड : विंचूर ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी नाशिकहून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना झाली. येथील लोणजाई माता व वै. दासोेबा महाराज काशीकर, भगरीबाबा, तुकाराम महाराज खेडलेकर, महेशानंद स्वामी, नानाजी महाराज वडनेरे व बाळासाहेब कानडे यांच्या आशीर्वादाने संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त विंचूर येथून पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते. सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे गजानन महाराज कवाडकर व निवृत्ती महाराज सदगीर यांचे कीर्तन होणार आहे. दिंडी सोहळा यशस्वीतेसाठी माणिक महाराज शास्त्री, अनिल बाळासाहेब कानडे, श्रीपत भीमाजी राऊत, कांतीलाल ढवण, सुधाकर जाधव, वसंत जाधव, पोपट जाधव, मधुकर दरेकर, वसंत भिवाजी कानडे, परशराम जेऊघाले, गोपाळ दरेकर,प्रणव दरेकर,बाबाजी डांगरे, काशिनाथ दरेकर आदि परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)