मान्सूनपूर्व तडाखा; सिन्नर, येवल्यात वादळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:25 AM2018-06-02T01:25:19+5:302018-06-02T01:25:19+5:30

सिन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाला. पांढुर्ली- भगूर रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. विंचूरदळवी शिवारात वादळाने शेतकऱ्याच्या नेटशेडचे नुकसान झाले.

 Monsoon strikes; Sinnar, Windy Rain in Yeola | मान्सूनपूर्व तडाखा; सिन्नर, येवल्यात वादळी पाऊस

मान्सूनपूर्व तडाखा; सिन्नर, येवल्यात वादळी पाऊस

googlenewsNext

मुंबई/नाशिक : केरळात धडक मारलेल्या मान्सूनची महाराष्ट्राच्या दिशेने दमदार आगेकूच सुरू असताना मान्सूनपूर्व पावसाचा हंगामा सुरू झाला आहे. मराठवाड्यात उस्मानाबादसह भूम आणि नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात गुरुवारी रात्री अतिवृष्टी झाली. धुळे जिल्ह्यात गारपीट झाली. शुक्रवारी सायंकाळी पुण्यासह सातारा शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला.
सिन्नर तालुक्यात वादळी पाऊस
सिन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाला. पांढुर्ली- भगूर रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. विंचूरदळवी शिवारात वादळाने शेतकऱ्याच्या नेटशेडचे नुकसान झाले. पश्चिम पट्ट्यातील पांढुर्ली, विंचूरदळवी भागात वादळी पाऊस झाला. वावी, घोटेवाडी, पांगरी, देवपूर, वडांगळी परिसरात वादळी पाऊस झाला. सायखेडा परिसरातील भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, महाजनपूर, म्हाळसाकोरे परिसरात तुरळक पावसाने हजेरी लावली. पावसाची सुरुवात झाल्याने शेतकºयांना सुखद धक्का मिळाला आहे.  येवला तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली यावेळी वादळी वाºयासह गारांचा पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसाने पूर्व भागातील अंदरसूल, देवळाने, गवंडगाव, गारखेडे परीसरासह ममदापूर, सावरगाव परिसरात चांगलीच त्रेधा उडाली.
नांदेड शहरासह जिल्ह्यात गुरुवारी रात्री झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र धांदल उडाली़ शहरातील हिंगोलीगेट अंडरब्रीज पावसाने बंद पडला़ नवामोंढा, महावीर चौक, भगतसिंघ रोड, आनंदनगर, बाबानगर भागात पाणी साचले होते़ नांदेड शहरात ४९ मिमी पावसाची नोंद झाली. भोकर तालुक्यात तासभर झालेल्या धो-धो पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. धारजनी येथे झालेल्या पावसात घराची भिंत पडून परमेश्वर पांडुरंग कानगुलकर (११) यांचा मृत्यू झाला तर घरातील तिघे किरकोळ जखमी झाले. मुदखेड, अर्धापूर, कंधार, लोहा, नायगाव आदी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यालाही पावसाने झोडपले. पाडोळी, भूम, माणकेश्वर मंडळातही अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

Web Title:  Monsoon strikes; Sinnar, Windy Rain in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस