विविध मागण्यासांठी मूकबधिरांची रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:49 AM2017-09-29T00:49:27+5:302017-09-29T00:49:34+5:30
जागतिक कर्णबधिर दिनाच्या निमित्ताने मूकबधिर असोसिएशनच्या वतीने शहरातून रॅली काढून जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
नाशिक : जागतिक कर्णबधिर दिनाच्या निमित्ताने मूकबधिर असोसिएशनच्या वतीने शहरातून रॅली काढून जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
रचना विद्यालय येथून निघालेली ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. त्यावेळी शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन सादर केले. त्यात कर्णबधिर दिन साजरा करण्यासाठी शासकीय व निमशासकीय, खासगी संस्थांमधील कर्मचाºयांना विशेष रजा दिली जावी, मूकबधिर व्यक्तींना वाहनपरवाना देण्यात यावा, इतर अपंगाप्रमाणे हक्क व समान न्याय मिळावा, मूकबधिरांची जी सांकेतिक भाषा आहे. त्याला भाषेचा दर्जा मिळावा, मुकबधिरांसाठी सांकेतिक भाषेत शिक्षण उपलब्ध नसल्याने नोकरीत उच्च शिक्षणाची अट ठेवू नये, अपंगत्वाचा दाखला त्वरित देण्यात यावा, सरकारी नोकºयांमध्ये मूकबधिर अपंगत्वाच्या जागा त्वरित भराव्यात आदी मागण्या त्यात करण्यात आल्या आहेत. या रॅलीत गोपाळ बिरारे, सतीश गायकवाड यांच्यासह मूकबधिर व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.